ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची कलासंस्कृती पैठणी दालनास भेट.

  
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची कलासंस्कृती पैठणी दालनास भेट.
जळगाव नेऊर येथील पैठणी उत्पादक व विक्रेते तरूणांचे केले कौतुक.
जळगाव नेऊर - जळगाव नेऊर ता.येवला नवीन कलासंस्कृती पैठणी दालनास ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवार दि.४ रोजी भेट देवून पैठणी तयार करण्याच्या कारखान्यासह पैठणीची पाहणी करून पैठणी तयार करणे, पैठणी निर्मिती बाबत  माहिती जाणून घेतली.ग्रामीण भागात पैठणीचा व्यवसाय करून उत्पादक व विक्रेते यामुळे सातासमुद्रापार पैठणी पोहचवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याने दत्तु वाघ व तुकाराम रेंढे या तरूणांचे कौतुक केले. कला संस्कृती पैठणीचे संचालक दत्तु वाघ व तुकाराम रेंढे यांनी दादा भुसे यांचा यथोचित सत्कार केला.यावेळी बाजीराव सोनवणे, रतन बोरनारे, सुकदेव भुसे, दत्तु शिंदे, राजेंद्र शिंदे, वारूबा वाळके, बापूसाहेब वाघ, भाऊसाहेब शिंदे, उल्केश वाक्चौरे, तौसिब शेख,छबु ठोंबरे,ऋषीकेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, पो.नाईक संजय मोरे, गडाख, रंगिला क्रिकेट संघातील खेळाडू,ग्रामस्थ उपस्थित होते.
शालेय सवंगडी असलेले दत्तु वाघ,तुकाराम रेंढे या तरूणांची घरची परिस्थिती बेताची असताना शिक्षण पुर्ण करूनही नोकरीची शाश्वती नसल्याने २००६ मध्ये पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण पुर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी जळगाव नेऊर येथे पैठणी तयार करण्याचा प्रयत्न या तरूणांनी यशस्वी केला. इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीप्रमाणे सदर व्यवसायाला गती प्राप्त होत गेली. त्यातून एक-एक करून असंख्य माणसे जोडली व हक्काचा ग्राहक वर्ग तयार केला. जिद्द, चिकाटी, इच्छा असेल तर मार्ग दिसेल याप्रमाणे अनेक संकटांना सामोरे जाऊन या युवकांनी शालेय सवंगडी, पैठणी कारागीर व पैठणी शोरुमचे मालक असा प्रवास करून शुन्यातुन स्वःमालकीचे कलासंस्कृती हे भव्य पैठणीचे शोरूम व हातमाग कारखाना उभा करून रविवार दि. २१ जानेवारी २०१८ रोजी शानदार उदघाटन केले अशी माहिती दादा भुसे यांना समजल्यावर दत्तु वाघ व तुकाराम रेंढे या तरुणांचे कौतुक केले.
फोटोखाली- जळगाव नेऊर ता.येवला येथील कलासंस्कृती पैठणीत रविवार दि.४ रोजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे पैठणीची पाहणी करताना सोबत कलासंस्कृती पैठणीचे संचालक दत्तु वाघ,तुकाराम रेंढे आदी.

थोडे नवीन जरा जुने