मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी छगन भुजबळ समर्थ - मोहन शेलार

मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी छगन भुजबळ समर्थ - मोहन शेलार

 येवला   :  प्रतिनिधी
2009 ला मा. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना संपूर्ण मंत्री मंडळाची बैठक नाशिक मध्ये घेतली. संपूर्ण मंत्रिमंडळाची मुंबई आणि नागपूरच्या बाहेर झालेली  ती पहिली बैठक होती. 3 ते 4 वर्षात 80 % पूर्ण झालेला एकमेव प्रकल्प म्हणून मांजरपाडा हा देशात पहिलाच प्रकल्प आहे. मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करायला मा. छगन भुजबळ समर्थ आहेत.आम्ही प्रकल्प पूर्ण करू असे म्हणणारे पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे अचानक उगविलेले  आणि प्रसिद्धीसाठी हापापलेले तथाकथित नेते इतके दिवस झोपले होते का ? अशी बोचरी टीका येवला पंचायत समितीचे सदस्य मोहन शेलार यांनी केली आहे.

मोहन शेलार यांनी म्हटले आहे की, देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर ऑक्टोबर २०१४ पासून मांजरपाडा प्रकल्पाचे काम बंद झाले होते. सत्ता असतांना छगन भुजबळ यांनी ७० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली होती. मात्र, सरकारने ते पैसे सुद्धा इतरत्र वळविले. इतकेच नव्हे तर भुजबळ साहेबांनी कलाग्राम, बोटक्लब सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प पूर्ण करून देखील ही कामे राजकारण करून सुरू करण्याची सरकारने तसदी सुद्धा घेतली नाही.  तरी देखील छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच मांजरपाडा प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली. आणि त्यानंतर सदर प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. जानेवारी २०१९ प्रयत्न सदर प्रकल्प पूर्ण झालेला राहील आणि येणाऱ्या पावसाळ्यात येवल्यासह दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होऊन हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. त्यासाठी छगन भुजबळ साहेबांनी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन  प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहे. आता काम पूर्णत्वास येत असतांना तथाकथित नेते कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करत तथाकथित नेते बऱ्याच वर्षाच्या कुंभकर्णा प्रमाणे झोपेनंतर अचानक जागे झाले असून त्यांच्या डोळ्यावरील झापडे आत्ताशी उघडले असल्याची टीका त्यांनी केली.

केवळ मांजरपाडा प्रकल्प नव्हे तर पुणेगाव दरसवाडी कालव्याची पाहणी करून कालव्याच्या माध्यमातून अधिक पाणी मिळण्यासाठी छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना या कालव्याचे विस्तारीकरण करण्याबरोबरच काँक्रीटीकरण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव करून पाठविण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. हेही काम लवकरच सुरू होईल आणि दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळणार आहे. ही सर्व विकासाची महत्वपूर्ण  कामे मार्गी लागत असतांना केवळ निवडणुका आल्याने विकासात राजकारण करून श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, केवळ पाहणी करण्याचे फोटो काढून आणि ते वर्तमान पत्रांमध्ये छापुन कामे मार्गी लागत नाहीत. सरपंच म्हणून काम पहात असलेल्या गावाचा आधी विकास करून दाखवावा, गाव परिपूर्ण करून दाखवावं मग मतदार संघातील प्रश्नावर बोलावं अशीही टीका मोहन शेलार यांनी केली असून तालुक्यातील जनता इतकी दूधखुळी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
थोडे नवीन जरा जुने