जळगाव नेऊर ग्रामस्थ, पैठणी उत्पादकांच्या वतीने सत्कार स्मार्ट ग्राम जळगाव नेऊर करांचा सत्कार

जळगाव नेऊर ग्रामस्थ, पैठणी उत्पादकांच्या वतीने सत्कार

स्मार्ट ग्राम जळगाव नेऊर करांचा सत्कार 
येवला : प्रतिनिधी
...जळगाव नेऊर ग्रामपंचायतीला नुकताच" स्मार्ट ग्राम पुरस्कार' मिळाला ,यानिमित्त जळगाव नेऊर ग्रामस्थ,पैठणी उत्पादक विक्रेते  यांच्यावतीने ,नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक, संचालक तसेच येवला पंचायत समितीचे शिवसेना उपसभापती रुपचंदभाऊ भागवत यांच्या हस्ते सरपंच हिराबाई शिंदे, उपसरपंच श्रीदेव शिंदे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे ,व सदस्य यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.उपसभापती रुपचंद भागवत  यांनी शुभेच्छा देऊन ग्रामपंचायतीला सहकार्य आश्वासन दिले, यावेळी सत्काराला उत्तर देताना सरपंच शिंदे व ग्रामसेवक बोराडे यांनी ग्रामस्थांचे आभार मानून  ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मिळाला असुन सत्काराने आमची जबाबदारी आणखीन वाढली असल्याचे म्हटले आहे.यावेळी  माजी सरपंच हिराबाई शिवाजी शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख वाल्मिकराव गोरे,माजी सभापती प्रकाश वाघ,भगवान शिंदे,तुकाराम शिंदे, ज्ञानेश्वर भागवत,मनोज भागवत,तलाठी श्रीमती भगत, कोंडाजी शिंदे,विलास घुले,नवनाथ शिंदे, पुंजाबा शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, आबासाहेब घुले,शिवाजी तांबे, गोविंद तांबे, तुकाराम रेंढे, दत्तु वाघ,साहेबराव कुराडे,अशोक कुराडे,सागर कुराडे,लक्ष्मण कुराडे, अरुन कुराडे, भाऊसाहेब शिंदे, गोरख वाघ  व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी तांबे यांनी केले.

फोटो....येवला तालुक्यातील जळगाव नेऊर ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करतांना उपसभापती रुपचंद भागवत,सरपंच हिराबाई शिंदे,उपसरपंच श्रीदेव शिंदे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे.
थोडे नवीन जरा जुने