जागतिक लोकशाही दिनी देशमाने येथील चिमुकल्यांनी गिरीविले प्रत्यक्ष मतदानाचे धडे

जागतिक लोकशाही दिनी देशमाने येथील चिमुकल्यांनी गिरीविले प्रत्यक्ष मतदानाचे धडे

येवला : प्रतिनिधी
भारताच्या संसदीय लोकशाहीचा  मतदान प्रक्रिया हा अविभाज्य घटक आहे. परंतु या प्रक्रियेपासून शालेय विदयार्थी हे अनभिज्ञ असतात . त्यांच्यासाठी मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा आनंद . शाळेत नागरिकशास्त्र शिकविले जाते पण त्याला प्रत्यक्ष अनुभवांची जोड नसते. त्यामुळे भारतीय संविधानातील कलम ३२४ते ३२९ या सर्व कलमांना प्रत्यक्ष समजूनघेण्यासाठी जि.प प्राथमिक शाळा देशमाने बु येथील शिक्षकांनी आपल्या  शाळेच्या मंत्रिमंडळाची निवडणूक खऱ्याखुऱ्या मतदान प्रक्रियेद्वारे घेण्याचे ठरविले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. 3 री ते 7 वी चे 153 विद्यार्थी मतदानास पात्र ठरवून त्यांची संगणकावर छायांकित मतदार यादी तयार झाली. 6 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.  अधिसूचना जाहीर होण्यापासून प्रत्यक्ष मतदान व मंत्र्यांचा शपथविधी पर्यंत सर्व टप्पे विद्यार्थ्यांना समजावून सांगत  मत्तपत्रिकेद्वारे मतदान कसे करावे ?  आचारसंहिता काशी पाळावी? ह्या सर्व बाबी शिक्षकांनी समजावून सांगीतल्या. 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत  30 विद्यार्थ्यांनी विविध 8 मंत्रिपदाचा जागांसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पुढील टप्प्यात 8 उमेदवारांनी   माघार घेतली व 22 उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली . चिन्ह वाटपावरुन थोडी कुरबुरपण झाली आणि प्रचाराचा नारळ फुटला. उमेदवार मोठ्या उत्साहात मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना निवडून आल्यावर शाळेसाठी काय करणार हे पटवून  देत आपल्याच चिन्हासमोर खूण करण्याची विनंती करू लागले. प्रचारसभेत प्रत्येक उमेदवाराने आपली मनोगते व्यक्त करीत आपणच निवडून येण्याचा आव आणला. काही उमेदवारांनी चॉकलेट , पेन , वडे देण्याची अमिषेही दाखवली. आणि 19 तारखेला प्रचार बंदकरण्यात आला. विद्यार्थ्यांमधूनच 6 मतदान अधिकाऱ्यांची टीम तयार करून शिक्षकांनी त्यांना प्रशिक्षण दिले . प्रत्यक्ष मतदान दिनांक 20 ऑगस्ट रोजी घेण्यात आले.
उपक्रमास तहसीलदार नरेश बहिरम यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले .पुढील वर्षी मतदान प्रक्रियेचे सर्व साहित्य पुरविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उपक्रमासाठी तहसीलदार  नरेश बहिरम , गटविकास अधिकारी श्री सुनील आहिरे, गटशिक्षणाधिकारी  मनोहर वाघमारे, केंद्रप्रमुख  निंबा केदारे मुख्यध्यापक  पुंडलिक अनारसे यांचे मार्गदर्शन लाभले. संगणकीय व तांत्रिक कामकाज तंत्रस्नेही शिक्षक श्री संजय सोनवणे , श्री अनिल महाजन , यांनी केले. कार्यक्रमास सरपंच सौ विमलताई शिंदे ,उपसरपंच भारत बोरसे ,  मा. मुख्यध्यापक रतन गोसावी गणेश दुघड , संदीप दुघड व ग्रामस्थ उपस्थित होते .शिक्षक दादासाहेब बोराडे, सुनील मखरे ,  अनिल महाजन संजय सोनवणे, श्रीमती मनिषा खैरनार, श्रीमती जिजा जावळे, श्रीमती सुनीता बुवा श्रीमती धनश्री वडनेरे, यांनी संयोजन केले.
     तर केंद्रअध्यक्ष-मृण्मयी जाधव, मतदान अधिकारी-पायल दुघड, प्रसन्न पवार, सोनाली खैरनार, ऋषिकेश आरगडे,समाधान खैरनार या विद्यार्थ्यांची सदर निवडणुकीसाठी अधिकारी म्हणून शालेय प्रशासनाकडून नियुक्ती करण्यात आली होती
    मतदान करण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यात आली होती तर मतमोजणी व निकाल २१ऑगस्ट रोजी घोषित करण्यात येणार असल्याचे शालेय प्रशासनाकडून सांगण्यात आले आह
फोटो ओळी:
 मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आलेले येवला तहसीलदार नरेश बहिरम समवेत जि. प शाळा देशमाने बु चेकेंद्र प्रमुख निंबा केदारे, मुख्यध्यापक अनारसे सर, मा .मुख्याध्यापक रतन गोसावी सर व शिक्षक वृंद
थोडे नवीन जरा जुने