येवल्याच्या कासलीवाल परिवाराचे आदिवासी आश्रम शाळेत रक्षाबंधन
येवला : प्रतिनिधी
रक्षाबंधनसर्वत्र उत्साहात साजरा होत असताना मात्र येवल्यातील कासलीवाल परिवार कुटुंबातील लहान मुलाने विचारलेल्या पश्नामूळे निरुत्तर झाले.रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी राख्या खरेदीच्या चर्चेत गरीबाघरी रक्षाबंधन कसे होत असेल,गोर गरीब आदिवासी भावा बहिणींना हा सण कसा साजरा करावा लागत असेल असा प्रश्न आर्जव या लहान मुलाने विचारल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते अलकेश कासलीवाल व त्यांचा परिवार निरुत्तर झाला.आणि त्यामुळेच त्यांनी कुटुंबात साजरा होणारा रक्षाबंधन सण गरीब आदिवासी मुलांसोबत साजरा करण्याचे ठरविले. आंनद वाटण्यासाठी त्यांनी नगरसुलच्या संत नारायनगिरिजी आश्रम शाळेत संपर्क साधला.कासलीवाल परिवाराने सोमवारी सर्व कुटुंबियासह नगरसुल येथे येऊन आदिवासी मुलांसोबत रक्षाबंधन साजरे केले.मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी मिठाई व फळांचे वाटपही केले.कासलीवाल परिवारामुळे या प्रेमाच्या वर्षावामुळे आदिवासी कुटूंबीयापासून शिक्षणासाठी दूर राहत असलेल्या हे चिमुकले विद्यार्थी आनंदून गेले.आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी कासलीवाल कटुंबतील सचिन कासलीवाल, नगीनाबाई कासलीवाल,
खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड,नागरसुलचे जेष्ठनेते प्रमोद पाटील,पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, माजी नगरसेवक नितीन काबरा,नगरसेवक संतोष पेरदेशी,किरण गायकवाड, राजू पाटील,प्रसाद सोनवणे, सुनील पगारे,गणेश कोल्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.जेष्ठ नेते प्रमोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक खैरनार ,नगरसेवक नितीन काबरा यांनी वेळी आपले मनोगत व्यक्तकरून कासलीवाल कुटुंबाला धन्यवाद देऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.मुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर प्राथमिक विभागाच्या मुख्यध्यापिका सौ बेंडके व शिवाजी जाधव यांनी विद्यालयाच्या वतीने कासलीवाल कटुंबिय व उपस्थितांचे आभार मानले.