अंगठा नाही,मशिन बंद पडले तरी आधारकार्डवर मिळणार खते! शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाकडून पर्याय



अंगठा नाही,मशिन बंद पडले तरी आधारकार्डवर मिळणार खते!

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाकडून पर्याय

 


येवला  : प्रतिनिधी

खतविक्री दुकानातील पॉस मशिन बंद पडले किंवा इतर अडथळे येतायेत किंवा अंगठा मशीनवर स्वीकारला गेला नाही, तरीही आता शेतकऱ्यांना केवळ आधार कार्डावर रासायनिक खते तत्काळ मिळणार आहे.कृषी विभागाने तांत्रिक अडचणीच्या वेळी शेतकऱ्याने केवळ आधार नंबर दिला तरी खते देण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

शासनाने शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी आधारकार्ड व अंगठा सक्तीचे केले होते. पॉस मशीनवर आधार नंबरची नोंदणी झाल्यानंतर हाताचा अंगठा मशीनवर द्यावा लागत होता.त्यामुळे तेथेच बिल तयार केले जाऊन शेतकऱ्यांना खत मिळत होते. खते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष हातात पडल्यानंतरच कंपन्यांना अनुदान मिळत आहे.मात्र हि सुविधा असली तरी पॉस मशिनच्या कडक नियमावलीचा शेतकऱ्यांना हाकनाहक त्रास सहन करण्याची वेळ येत होती.वीजपुरवठा,मशीनला रेंज वा तांत्रिक अडचणींमुळे पॉस मशिन बंद राहण्याचे प्रकार घडत होते.यामुळे खेड्यापाड्यावरून आलेल्या शेतकऱ्यांना खत न घेता माघारी जावे लागत होते.याबाबत तक्रारी वाढल्याने केवळ शेतकऱ्याचा आधार नंबर घ्या व खत वाटण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिलेल्या आहेत.

शेतकऱ्याने आधार नंबर व अंगठ्याचा ठसा नसल्याशिवाय खतांची विक्री न करण्याचा हेतू शासनाचा आहे.मात्र यावर पर्याय शोधत आता पॉस मशिन बंद असेल तर आधार नंबर घेतल्यानंतर कच्ची नोंद करून पक्की पावती देत दुकानदार खतांची विक्री होत आहे. मशिन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून दुकानदार स्वतःच्या अंगठ्याचा ठसा देतो.यामुळे शेतकऱ्याला बिगर पॉस प्रणालीतून आधी दिलेल्या खतविक्रीचा व्यवहार मागावून नोंदविता येतो.या सोयीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.

 

"पॉस मशीनला रेंज नसणे किंवा शेतकऱ्यांचे अंगठे मशीनने न स्वीकारणे अशा अडचणी यापूर्वी सातत्याने येत होत्या.आता कृषी विभागाने मशीन सुरु झाल्यावर हि प्रकिया करण्याला व शेतकऱ्याचा आधार नंबर घेऊन दुकानदाराचा अंगठयाला मान्यता दिली आहे.यामुळे शेतकऱ्यांना खते न घेता माघारी जाण्याची वेळ येत नाही."

-नितीन काबरा,संचालक,द्वारका एजन्सी,येवला 



 
 
 

थोडे नवीन जरा जुने