नारायणगिरी महाराज फाऊंडेशन तर्फे दिलीप वालतुरे यांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत

नारायणगिरी महाराज फाऊंडेशन  तर्फे दिलीप वालतुरे यांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील सायगाव येथे दिलीप कारभारी वालतुरे हा तिशीतील तरुण गेल्या एक महिन्यापासून नाशिक येथे खाजगी रुग्णालयात कॅन्सर शी जीवन मरणाचा संघर्ष करत उपचार घेत आहे. वडील कारभारी वालतुरे हे पाहिजे तो प्रयत्न करत काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. घरची परिस्थिती अतिशय गरीब आणि त्यात पावसाने दडी मारली आणि उत्पन्नाची बाजू थांबून गेली. भांडवल अडकले आणि असा आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला. त्यावेळी त्यांना मदतीची गरज असल्याची माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष उद्योगपती विष्णूभाऊ भागवत यांना समजताच त्यांचे सल्लाने शिवसेना उपसभापती तथा येवला लासलगाव विधानसभा संघटक रुपचंद भागवत हे मदतीला धावून आले. यांचे सह फाउंडेशन चे प्रा विलास भागवत सर,देविदास जानराव सर, मनोज भागवत, एकनाथ भालेराव, ज्ञानेश्वर भागवत आले. यावेळी सायगावचे माजी उपसरपंच गणपतराव खैरनार, माजी सरपंच गोरख भालेराव, ग्राम. सदस्य दिनेश खैरनार, सोसा चेअरमन गणपत उशीर, बशीरभाई शेख,  सचिन लोहकरे, कारभारी वालतुरे, वाल्मीक वालतुरे, साहेबराव वालतुरे, पोपट मुळे, आनंद पठारे, संजय मूळे, प्रल्हाद मोरे, दामू बत्तासे, सुनील सोनवणे, दयानंद पठारे, शंकर वालतुरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दिलीप हा विवाहित तरुण आणि त्याला १ मुलगा आहे असा गरीब पण सुखी संसार. अचानक दिलीप ला गळ्याजवळ गाठ आली उपचारादरम्यान निदान झाले कि ती कॅन्सर ची आहे. मग खरी धावपळ सुरु झाली व तात्काळ ऑपरेशन साठी ऍडमिट केले गेले. सर्व पाहुणे ऐपतीप्रमाणे पैसे घेऊन आले. विविध उपचार पद्धती त्यात केमो थेरपी महागडा खर्च. प्रत्येक वेळेस कशी मदत मागावी अशा वेळी नजरेसमोर आणखी एक पर्याय दिसला तो म्हणजे नारायणगिरी महाराज फाउंडेशन व कर्तव्यदक्ष उपसभापती रुपचंदभाऊ भागवत आणि माहिती मिळताच नियमात बसवून अकरा हजार रु ची चेक स्वरूपात गोळ्या औषधोपचारासाठी फाउंडेशन ने मदत केली. यावेळी दिलीप लवकर बरा होऊन घरी आला कि त्याला शुभेच्छा देण्यासाठी पुन्हा एकदा भेट देऊ असे रुपचंदभाऊ यांनी सांगितले. यावेळी वडिल कारभारी वालतुरे यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू टपकले व सर्व उपस्थित भावुक झाले. स्वच्छ भावनेने केलेली मदत हृदयापर्यंत कशी पोहचते याचा यावेळी सर्वांना प्रत्येय आला. 
थोडे नवीन जरा जुने