ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनी मुक्ती महोत्सवाचे आयोजन येवल्यात ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर पर्यत विविध सामाजिक प्रबोधन कार्यक्रमऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनी मुक्ती महोत्सवाचे आयोजन

येवल्यात ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर पर्यत विविध सामाजिक प्रबोधन कार्यक्रम


येवला :  प्रतिनिधी

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला मुक्कामी मुंबई इलखा अस्पृश्य वर्गाची ऐतिहासिक परिषद घेऊन जगाला हदरविणारी क्रांतिकारी धर्मांतर घोषणा केली होती.त्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८३ वा वर्धापनदिनाला येथील मुक्तीभूमिवर मुक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था नाशिक व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येवला यांच्या संयुक्त विद्यमाने ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर पर्यत विविध सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांनी मुक्ती महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक प्रवर्तक शरद शेजवळ व संयोजन समितीने दिली.

३० रोजी दुपारी दीड वाजता मुक्ती महोत्सव उदघाटन व लोक धम्म स्कुल प्रशिक्षण कार्यशाळा होईल.यासाठी धम्म प्रचारक प्रा.उमेश पाठारे,उल्हास फुलझेले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.याकाळात विपश्यना ध्यानधारणा प्रशिक्षण आचार्य अशोक बनकर हे देणार आहेत.१ ऑक्टोबरला महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा तर २ ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे.३ ते १२ तारखेदरम्यान पाली भाषा प्रशिक्षण वर्ग होऊन मार्गदर्शन पालीभाषाचार्य नंदकिशोर साळवे,संतोष जोपुलकर करणार आहे.५ ऑक्टोबरला प्रबुद्ध लोकशाहिरी कार्यशाळा शाहीर स्वप्नील डुंबरे घेणार आहेत.

७ ला पत्रकार संपादक सुधीर लंके यांचे तर ९ ला पत्रकार संजय आवटे यांचे जाहीर व्याख्यान होईल.१२ तारखेला युवती-महिला मेळावा,खुली संविधान ज्ञान परीक्षा,परिसंवाद आदि भरगच्च कार्यक्रम होतील.तर १३ ऑक्टोबरला बुद्ध आंबेडकरी सामाजिक प्रबोधन शाहिरिचा मुक्ती पहाट कार्यक्रम,सर्व रोगनिदान,रक्तदान शिबीर आदी विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निमंत्रक शरद शेजवळ,संयोजक प्रमुख एस. डी. जाधव,सुरेश खळे,विनोद त्रिभुवन,अशोक पगारे,मिलिंद गुंजाळ, संतोष उबाळे,बाळासाहेब गोविंद,बाबूलाल पडवळ,सुनील खरे,गौरव साबळे,सागर खैरनार,सिद्धार्थ शेजवळ,मयुर सोनवणे,राहुल गुंजाळ,बापू वाघ,गौरव थोरात,तेजस पठारे,सुभाष वाघेरे,अण्णाजी पवार,सविता धिवर,

रंजना पठारे,रेखा साबळे,मंदा उबाळे,रवींद्र गुंजाळ,राहुल गुंजाळ,अमरीश सोनवणे आदी प्रयत्नशील आहे.

 

थोडे नवीन जरा जुने