गणेशविसर्जनानतर अंगणगावचा घाट स्वच्छतेमुळे झाला चकाचक संतोष जनसेवा मित्र मंडळाची मोहीम,बोटिंग क्लबवरही स्वच्छता

गणेशविसर्जनानतर अंगणगावचा घाट स्वच्छतेमुळे झाला चकाचक  

संतोष जनसेवा मित्र मंडळाची मोहीम,बोटिंग क्लबवरही स्वच्छता 

 येवला : प्रतिनिधी

शहराजवळील अंगणगाव येथे देखण्या अहिल्याबाई होळकर घाटावर गणेशविसर्जन झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा,घाण साचली होती.आजूबाजूला गवतही वाढल्याने विद्रुपीकरण झाले होते.यामुळे आज संतोष जनसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी

येथे स्वच्छता मोहिम राबवत परिसराला चकाकी दिली.

अंगणगाव येथील घाटावर तसेच शेजारील बोटिंग क्लबवर रोज शेकडो येवेलेकर फिरायला व चालण्यासाठी येतात.मात्र गणेशविसर्जन झाल्यावर येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढले होते.तसेच प्लास्टिक कचरा,बाटल्या यामुळे अस्वच्छता पसरल्याने फिरणाऱ्या नागरिकांची होणारी अडचण पाहता ती थांबवण्यासाठी येथील संतोष जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.येथील वाढलेले गवत देखील या मोहिमेत काढण्यात आले.सुमारे तीन ट्रकटर कचरा येथून उचलण्यात आला.येथे लावलेल्या पेवर मधून उगवलेले गवत देखील काढण्यात आले.

तसेच बोटिंग क्लब परिसरात सद्या तलावा सभोवताली मोठ-मोठ्या बाभळींचे साम्राज्य झाले असून या ठिकाणी तलावाला गवताने घेरले आहे.पायी चालण्यासाठी जॉगिंग ट्रक उभारण्यात आला असून या ट्रकवर फिरणार्या नागरिक व वयोवृद्धांना सदरच्या सदर काटेरी झाडा- झुडपांच्या साम्राज्यामुळे त्रास होत असून बोटिंग क्लबचे देखणेपणही यामुळे हरवले आहे.त्यामुळे येथे देखील मोहीम राबवून रस्त्यात अडथळा ठरत असलेली झुडपे काढण्यात आली. मंडळाच्या मकरंद तक्ते,संजय गायकवाड,मनोज सांगळे,तुषार जेजुरकर आदीसह ४० वर स्वयंसेवकानी या मोहिमेत सहभाग घेतला. येथील तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून कडेला देखील गवत वाढले आहे.पाणी संपल्यावर ग्रामपंचायतच्या मदतीने हि स्वच्छता करण्यासाठी देखील पुढाकार घेण्याचे यावेळी अध्यक्ष दराडे यांनी सांगितले.

 

 

"गणेशविसर्जनानतर अंगणगावचा घाट परिसरात विविधप्रकारचा केरकचरा पडलेला होता.येथे नागरिक फिरण्यासाठी येत असतात.त्यांना याचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही स्वयंस्फूर्तीने आज चार-पाच हि मोहीम राबवली.शेजारील बोटिंग क्लबवर देखील ट्रकवर अडथला ठरणारी काही भागातील झुडपे हटवण्यात आली.यापुढे पुन्हा अशी मोहीम राबवली जाईल."

-कुणाल दराडे,अध्यक्ष,संतोष जनसेवा मित्र मंडळ

 

"आम्ही बॉटींग क्लबच्या जॉगींग ट्रॅकवर नेहमी फिरण्यासाठी येत असतो. इथले वातावरण खुप छान आहे.परंतु काही दिवसांपासुन इथे झाडे वैगेरे खुप वाढली तसेच अस्वच्छतेचे साम्राज्य खुप वाढले होते.संतोष जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने इथे स्वच्छता मोहीम राबविल्याने होणारा त्रास कमी झाला आहे.घाटावरील स्वच्छतेने तर तेथील चित्र बदलले आहे."

-राजश्री गायकवाड, महिला

 थोडे नवीन जरा जुने