नारायणगिरी महाराज फाउंडेशन आयोजित हिला सबलीकरण शिबिरात 150 महिलांचा सहभाग

नारायणगिरी महाराज फाउंडेशन 
आयोजित हिला सबलीकरण शिबिरात 150 महिलांचा सहभाग

येवला : प्रतिनिधी
 
येवला तालुक्यातील भारम येथे  नारायणगिरी महाराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण भागातील महिलांसाठी महिला सबलीकरण दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे,या शिबिराचे उद्घाटन उपसभापती रुपचंद भागवत यांच्या हस्ते झाले, यात सुमारे दीडशे महिलांनी सहभाग घेतला.

शिवसेना येवला लासलगाव विधानसभा संघटक व येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अनोखा उपक्रम सुरू केला आहे .

दोन दिवस सुरू असलेल्या शिबिरात ज्या महिलांचा शिवणक्लास पूर्ण झाला आहे परंतु त्यांना मास्टर कटिंग येत नाही अशा महिलांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले . दरम्यान एम एफ डी मॅजिक कटिंग स्केल मार्फत फॅशन डिझाईन शिवणकामातील कटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे  प्रसंगी कोपरगाव येथील एम एफ डी मॅजिक कटिंग स्केलचे प्रशिक्षक शंकर बोरणारे ,मोनाली बोरणारे , शिवनाथ बोरणारे यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण देत आहे.यावेळी , येवला लासलगाव विधानसभा शिवसेना संघटक तथा येवला पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत ,  ,शिवसेनेचे युवा नेते नंदू आबा सोमशे,सरपंच आसाराम जेजुरकर,दत्तू जेजुरकर,गोपीनाथ जाधव,दत्ताभाऊ जेजुरकर,प्रा विलास भागवत,राजेंद्र गांजे,आप्पा भागवत,संजय पगारे, कोळमचे सरपंच सोपान चव्हाण,दिलीप गांजे,शिवसेना तालुका उपप्रमुक रावसाहेब नागरे,राजापूर गणप्रमुक प्रवीण आहेर,शिवसेना सहसंघटक वाल्मिक गुढघे, दिलीप सोनवणे ,बापू सोमशे,अशोक सोमशे, फाउंडेशन चे प्रसिद्धी प्रमुख एकनाथ भालेराव,न्यानेश्वर भागवत ,मनोज भागवत,आदींसह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान शिवसेना येवला लासलगाव विधानसभा व नारायणगिरी महाराज फाउंडेशन नशिकचे संस्थापक अध्यक्ष विष्णु भागवत यांचे संयुक्त विद्यमाने रूपचंद भाववत हा उपक्रम येवला लासलगाव विधानसभा अंतर्गत सर्व महिलांसाठी राबवणार आहे. तरी सर्व इच्छुक महिलांनी सदरचे उपक्रमात भाग घेऊन आपले ब्लाउज कटिंग व पंजाबी ड्रेस कटिंग मधील मास्टर कटिंगचे कौशल्य वाढवावे असे आवाहन रूपचंद भागवत यांनी केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिवसेना युवा नेते दत्ता जेजुरकर यांनी केले
थोडे नवीन जरा जुने