जवान दिगंबर शेळके कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश

 जवान दिगंबर शेळके कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश 

येवला  : प्रतिनिधी

 तेजपुर ( आसाम ) येथे शहीद झालेले मानोरी चे जवान दिगंबर शेळके यांच्या कुटुंबियांना जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगांव खुर्द  यांनी 21000 रुपये आणि कै. नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था येवला यांचे कडून 21000 रुपयांचा  धनादेश आर्थिक मदत म्हणून सोमवारी ( दि.1 ) ला देण्यात आली.
        यावेळी जगदंबा ट्रस्ट चे अध्यक्ष रावसाहेब कोटमे विश्वस्त  भाऊसाहेब  आदमने 
व्यवस्थापक  राजेंद्र कोटमे ,कै. नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक तसेच पंचायत समिती माजी सभापती संभाजी पवार ,मॅनेजर तांबोळी, विठ्ठल आठशेरे ,तुकाराम शेळके ,सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदाराम शेळके,ग्रा.प.सदस्य पोपट शेळके,संजय पगारे,बाबासाहेब तिपायले,राजू शेळके सर,बाळासाहेब पाटील,प्रभाकर वावधाने भाऊसाहेब फापाळे ,संजय खैरनार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

फोटो : जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगांव खुर्द  आणि कै. नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था येवला कडून शहीद जवान दिगंबर शेळके यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश देताना.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने