लेखी आश्वासनानंतर महिलेचे उपोषण मागे

लेखी आश्वासनानंतर महिलेचे उपोषण मागे



येवला : प्रतिनिधी
 अनुकंपा तत्वावर नोकरी नाकारत असल्याने होत असलेल्या अन्यायाचे विरोधात शकीलाबानो शकील अहमद या महिलेने अंजुमन तालिम ए निसवा संस्थेच्या उर्दु गर्ल्स हायस्कुल समोर उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची अखेर संस्थेला दखल घ्यावी लागली असून ११ ऑक्टोबर पासून शिपाई पदावर हजर रहावे असे लेखी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

शकीलाबानो शकील अहमद यांचे पतीचे सन २०१५ साली अल्पश: आजाराने निधन झाले.  मयत पतीचे जागेवर नोकरी मिळणे कमी सदर महिलेने संबंधित संस्थेकडे अनेक अर्ज केले परंतु सदर अर्जावर संस्थेने काहीही कार्यवाही न करता केवळ एक महिला असल्याचे कारण सांगून मयत पतीचे जागेवर नोकरी नाकारुन असल्याने महिलेने संस्थेच्या कार्यालया समोर ता. ८ ऑक्टोंबर पासुन बेमुदत उपोषण सुरु केले होते. त्या उपोषणाची दखल अखेर अंजुमन तालिम ए निसवा संस्थेच्या वतीने घेण्यात येऊन महिलेला शिपाई पदावर रुजू करण्याचे लेखी ता. ०९ रोजी देण्यात आले.  त्यामुळे महिलेने उपोषण मागे घेतले.   यावेळी शफिक शेख, मुश्ताक शेख, यामिन जरीवाले, शेख शाहरुख, शाळेच्या मुख्याध्यापिका शमीम अन्सारी आदी उपस्थित होते. 


थोडे नवीन जरा जुने