राजापूरला शॉर्ट सर्किटने आग लागून हार्डवेअरचे दुकान जळून खाक



राजापूरला शॉर्ट सर्किटने आग लागून हार्डवेअरचे दुकान जळून खाक

येवला : प्रतिनिधी
राजापूर येथील श्री हार्डवेअर या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून पूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार संचालक समाधान आव्हाड यांनी केली आहे.
बुधवारी रात्री दुकान बंद असताना अचानकपणे वीजपुरवठय़ातील दोषामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागली.या आगीत आतील सर्व साहित्य जळून खाक झाले.यातील इन्वर्टर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा,पीओपी,दहा एलईडी बल्ब,रंगाचे अनेकडब्बे,पंखा,10 एलईडी ट्यूब,वायर बंडल,सोनी टीव्ही तसेच मीटर व इतर कागदपत्रे असे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
या प्रकरणी आव्हाड यांच्या तक्रारीनुसार महावितरणचे सहाय्यक अभियंता सुरज कुमार हुरपडे तसेच तलाठय़ाने देखील पंचनामा केलेला असून यात मीटरसह हे सर्व साहित्य जळालेले आढाव नाल्याचे नमूद करण्यात आले आहे.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने कर्ज काढून दुकान सुरू केले होते मात्र आता सर्वच नुकसान झाल्याने मोठा मोठे संकट पडले आहे. याप्रकरणी सर्व नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.


थोडे नवीन जरा जुने