देशमाने केंद्रावर काव्यवाचन व एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न


देशमाने केंद्रावर काव्यवाचन व एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न
येवला : प्रतिनिधी

महात्मा फुले कला अकादमी नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा येवला व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशमाने केंद्रावर काव्यवाचन व एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आल्या. देशमाने येथील जनता विद्यालय केंद्र हायस्कूल या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या व सहभागी स्पर्धकांना बक्षिस वितरण समारंभ येवला पंचायत समिती उपसभापती तथा येवला लासलगाव विधानसभा संघटक रुपचंद भागवत व शिवसेना नेते छगन आहेर यांच्या प्रमुख उपस्तीत संपन्न झाला.  

सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात काव्य रचना करणे व ते सादरीकरण करणे या करिता देशमाने केंद्राने विध्यार्थाना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे या कविता रचनाकरण्यातून विध्यार्थाना आकलन शक्ती व कल्पकता वाढेल व मंचावर बोलण्याचे धाडस वाढेल व या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात उत्कृष्ट असे कवी तयार होतील व एक चांगले नागरिक बनतील असे या प्रसंगी उपसभापती रुपचंद भागवत यांनी व्यक्त केले . देशमाने केंद्रावर काव्य वाचन स्पर्धेत लहान गटात रेखा खताळे प्रथम, सुशान्त बागुल द्वितीय, अनुखा रंधे, उतेजनार्थ उर्मिला भोनवे,मोठा गट प्रथम ,काजल कदम दुतीय ,निकिता कदम तृतीय ,अमन पटेल उतेजनार्थ ,अभिनय लहान गट मध्ये प्रथम समृद्धी पडोळ ,दुतीय पायल रसाळ ,तिसरा जालिंदर पगारे,मोठा गट भारती सौदाने प्रथम,मुस्कान शेख दुसरा,वृषाली कदम तिसरी,उतेजनार्थ संदीप भालेराव, यांनी बाजी मारली परिक्षक म्हणून पत्रकार कवी लक्ष्मण बारहाते,विलास गोसावी,माधुरी सूर्यवंशी, पानसरे सर   यांनी काम पाहिले. 

देशमाने  केंद्रात झालेल्या स्पर्धेप्रसंगी, 105 स्पर्धकांनी भाग घेतला होता,यावेळी केंद्रप्रमुख केदारे सर, मुख्याध्यापक , वाघ सर,न्यानेश्वर भागवत,विकास चव्हाण,एकनाथ भालेराव,वंदना . सूत्रसंचालन  वाघ सर यांनी केले
थोडे नवीन जरा जुने