येवला नगरपरिषद कामगार सेनेची नूतन कार्यकारणी जाहीर

येवला नगरपरिषद कामगार सेनेची नूतन कार्यकारणी जाहीर


येवला  :  प्रतिनिधी

येवला नगरपरिषद कर्मचारी कामगार सेनेचा मेळावा येथे झाला. याप्रसंगी संघटनेच्या नविन कार्यकारणीची घोषित करण्यात आली.

या मेळावयाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते ब्रम्हानंद परदेशी होते. तर व्यासपीठावर जी.एन.उमरे,उदय परदेशी यांची उपस्थिती होती.या प्रसंगी पालिका कामगारांचे जुने प्रलंबित प्रश्नदीपावली दरम्यान कामगारांच्या आर्थिक मागण्या पूर्ण करणे  आदी विषयावर चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात ब्रम्हानंद परदेशी यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड झाली तर उपाध्यक्षपदी घनश्याम उंबरेसचिवपदी तुषार लोणारीखजिनदार विजय झाल्टेसंघटक प्रशांत पाटील कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश सातभाईमनोज गुठेकररमेश खलसेकेशव बिवालउदय परदेशीसुनील जाधवअर्जुन शिंदे यांची निवड करण्यात आली. कामगारांचे प्रश्नांना न्याय देण्याचा निर्धार ब्रम्हानंद परदेशीघनशाम उंबरे यांनी मनोगत व्यक्त करताना केला.

थोडे नवीन जरा जुने