येवला तालुक्यातील गवंडगाव येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे उद्घाटन
येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील गवंडगाव येथे दलित वस्ती सुधारणा निधीतून सिमेंट कॉंक्रीट रस्ता मंजूर झाला. त्याचे उद्घाटन शिवसेना येवला लासलगाव विधानसभा संघटक तथा पंचायत समिती उपसभापती रूपचंद भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रस्ता दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर असून सदर रस्त्याची लांबी 651 मीटर आहे. सदर रस्त्यासाठी दलित वस्ती सुधारणा योजनेतून वीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद झालेली आहे. सदर रस्ता उद्घाटन प्रसंगी शिवसेना येवला लासलगाव विधानसभा संघटक तथा पंचायत समिती येवला शिवसेना उपसभापती रूपचंद भागवत, गवंडगाव सरपंच वेणूनाथ भागवत, उपसरपंच सुप्रभा गायकवाड,निवृत्ती भागवत, अंबादास भागवत, दिलीप भागवत, आप्पासाहेब भागवत, संजय भागवत, नितिन भागवत, सुदाम गायकवाड, प्राध्यापक विलास भागवत सर, ताराचंद भागवत, विलास भागवत, ग्रामसेवक मोरे, सोसायटी चेअरमन प्रमोद भागवत, माजी चेअरमन अविनाश भागवत, बापू दाभाडे, नितीन भागवत, रामदास भागवत,सागर गायकवाड, विकास चव्हाण, ज्ञानेश्वर भागवत, प्रकाश गायकवाड,भास्कर भागवत, गणेश डुकरे, शंकर गायकवाड,आशपाक शेख,आदी ग्रामस्थ उपस्थित होते