औद्योगिक सहकारी वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.




औद्योगिक सहकारी वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.

येवला : प्रतिनिधी
येवला औद्योगिक सहकारी वसाहतीमधील उद्योजकांना सतावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 38 गाव पाणीपुरवठा योजनेला जोडल्याने अखेर सुटला आहे.वसाहतीत चालू असलेल्या 18 उद्योगांना पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे जेष्ठ नेते अॅड माणिकराव शिंदे,यांच्या हस्ते पाण्याच्या प्रवाहाची कळ खोलून  प्रवाह सुरु करण्यात आला.यावेळी वसाहतीचे चेअरमन अनिल कुक्कर,व्हाईस चेअरमन दत्ता महाले,माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी,अॅड नवीनचंद्र परदेशी यांच्या हस्ते नारळ वाढवून योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 
गेली अनेक वर्ष वसाहतीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता.38 गाव पाणी पुरवठा योजनेमधून वसाहतीत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी चेअरमन कुक्कर,व्हाईस चेअरमन महाले यांचेसह संचालक मंडळाने सातत्याने पाठपुरावा केला.38 गावाच्या योजनेतून किमान पिण्याचे पाणी कसे मिळू शकेल यासाठी थेट जिल्हापरिषदेत धडक मारून प्रयत्न झाले.सध्या व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारून 38 गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी घेतले आहे.औद्योगिक वसाहतीसह अंगणगावच्या काही ग्रामस्थांना देखील या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अॅड माणिकराव शिंदे, चेअरमन अनिल कुक्कर,व्हाईस चेअरमन  दत्ता महाले, संचालक भोलानाथ लोणारी, शाम कंदलकर,नाविनचंद्र परदेशी, विष्णू खैरनार,सुहास अलगट, अमोल वाघ, राजेश भंडारी, मयूर गुजराथी, रामदास काळे,अशोक शहा, राजू पवार, सुवर्णा गायकवाड,भाऊसाहेब मढवई,नवनाथ घुले,अनिल मुथा,नारायण गायकवाड,व्यवस्थापक सोपान पैठणकर उपस्थित होते.
=======================================
येवले औद्योगिक सहकारी वसाहतिच्या 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सौरउर्जा प्रकल्प उभारणीसह पाणीपुरवठा योजना सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले होते.यापैकी पाणीपुरवठा सुरु झाला असून सौर उर्जेचा प्रकल्प देखील हाती घेणार आहोत 
अनिल कुक्कर 
चेअरमन,औद्योगिक वसाहत 
========================================
 38 गाव पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे हे पाणी उद्योगासाठी वापरले जात नाही.केवळ पिण्यासाठी हे पाणी वापरले जाणार असल्याने घरगुती दराने आकारणी करण्याची निकड आहे.
दत्ता महाले 
व्हाईस चेअरमन 
येवला औद्योगिक वसाहत 
===============================
फोटो कॅप्शन 
येवला औद्योगिक सहकारी वसाहतीत पिण्याची पाणीपुरवठा योजना सुरु करतांना अॅड माणिकराव शिंदे,वसाहतीचे चेअरमन अनिल कुक्कर,व्हाईस चेअरमन दत्ता महाले,माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी,अॅड नवीनचंद्र परदेशी,यांचेसह संचालक मंडळ .

 

थोडे नवीन जरा जुने