येवला पोलीसांतर्फे रन फॉर युनिटी


येवला पोलीसांतर्फे रन फॉर युनिटी
येवला : प्रतिनिधी

लोहपुरूष सरदार  वल्लभ भाई पटेल यांच्या 143व्या जयंतीनिमित्त नासिक ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या प्रेरणेने येवला तालुका व येवला शहर पोलीस ठाण्याचे वतीने तसेच एस एन डी कॉलेज बाभुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि ३१ रोजी सकाळी ७ .३० वाजता एस एन  डी कॉलेज बाभुलगाव ते मार्केट गेट येवला पावेतो पाच किलोमीटर ची महा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती . त्यात एस एन डी कॉलेजचे तसेच तालुक्यातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी व नवचेतना अकॅडमी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला होता तसेच सदर स्पर्धा कार्यक्रमासाठी प्रांत अधिकारी भिमराज दराडे,
तालुका व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे व कर्मचारी हजर होते तसेच  मुख्याधिकारी  नांदूरकर, नगराध्यक्ष  बंडू क्षीरसागर , माणिकराव शिंदे  , रफियोद्दीन काजी , राजाभाऊ लोणारी , भाजपचे शहराध्यक्ष आनंद शिंदे  , दिपक पाटोदकर यांच्या सह एस एन डी कॉलेजचे शिक्षकवर्ग हजर होते सदर स्पर्धेच्या वेळी सहभागी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सदरची स्पर्धा शांततेत पार पडलेली असून योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने