येवल्यात चारशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्तयेवल्यात चारशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त 


येवला : प्रतिनिधी

शासनाच्या प्लास्टिकबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आता यंत्रणा सरसावली आहे.शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे चारशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून २५ हजारांवर दंड करण्यात आला आहे.

पालिकेने यापूर्वीच शहरात नागरिकांना वेळोवेळी प्लॅस्टिक वाहन वापरण्याची तंबी दिली आहे.प्लॅस्टिक बंदीबाबत दुकानदारांना नोटीसांसह वर्तमानपत्रातून देखील सार्वत्रिक नोटीस पालिकेने दिली असताना देखील आहे दुकानदार याला न जुमानता सर्रासपणे प्लास्टिक वापरत असल्याचे निदर्शनास आले होते.त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज दिवसभरात व येथील शिंदे प्लॅस्टिक दुकान सौभाग्य साडी सेंटर उमेद मला श्रीश्रीमाळ सुधाराचा सुदर्शन डसेस मनोकामना कापड  दुकानावर देखील धाड टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.या सर्वांना येते पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड करण्यात आलेला असून तंबीदेखील देण्यात आली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी एम जोशी पीएन धुमाळ एस्सार बडगुजर तसेच पालिकेचे स्वच्छता अभियंता श्रीकांत फागणेकर सुनील संसारे स्वच्छता निरीक्षक समन्वयक निखिलेश जामनेकर अजय दिघे यांचा या पथकात समावेश होता.

शहरातील सर्वच विक्रेत्यांवर यापुढे सतत कडक नजर ठेवून वेळोवेळी धाडी टाकण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिल्या आहे.प्लास्टिक आढळल्यास पहिल्यांदा पाच हजार दुसऱ्या वेळी पंधरा हजार व तिसऱया वेळी पंचवीस हजाराचा दंड केला जाणार असून त्यानंतरही प्लास्टिकचा वापर आढळल्यास दुकानाला कायमचे सील करण्याच्या सक्त सूचना मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी पथकाला दिल्या आहेत.नाशिकहून अचानक पथक आल्याने पालिका प्रशासन व पथक येथील पथकाची देखील चांगलीच धांदल झाली.याबाबतची माहिती मुख्याधिकाऱयांनी नगराध्यक्ष बंडू शिरसागर यांना देखील करविली होती. शहरातील दुकानदारांना अनेकदा प्लास्टिक बंदीबाबत नोटिसा व सूचना दिलेल्या आहेत.आजची ही पहिली कारवाई होती यापुढे अशाच अचानक धाडी टाकण्यात येऊन रोख दंड आकारण्यात येणार आहे.नागरीकरण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून प्लास्टिक पिशव्या वापर त्वरित बंद करावा.असे आवाहन संगीता नांदूरकर मुख्याधिकारी येवला यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने