चिचोंडी ग्रामस्थांनी केला सरकारचा निषेध, दुष्काळ गावांच्या यादीतून वगळल्याने संताप

चिचोंडी ग्रामस्थांनी केला सरकारचा निषेध,
दुष्काळ गावांच्या यादीतून वगळल्याने संताप
---

येवला : तालुका
येवला तालुका दुष्काळी जाहीर झाला मात्र यामध्ये येवला तालुक्यातील सतरा गावांवर अन्याय झाला असून येवला शहरातील पाऊस मोजमाप या सतरा गावांना लावून सरकारने दुष्काळ यादीतून चिचोंडी सह परिसरातील सतरा गावांना वगळले. या झालेल्या अन्यायाविरुद्ध चिचोंडी येथील शेतकऱ्यांनी दंडावर काळ्या फिती बांधून व काळे झेंडे दाखवत सरकारचा आज जाहीर निषेध करत रस्त्यावर ठाण मांडत सरकारच्या विरोधी घोषणा दिल्या. 
येवल्यावर पडणारा पाऊस फक्त येवला शहरातच पडतो गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर अनेकदा पाऊस पडत नसतांना दिसून येते त्यामुळे मंडळनिहाय जाहीर झालेला दुष्काळ खेड्यावर अन्याय करणारा असून आमच्या गावाचा दुष्काळ गावांच्या यादीत समावेश करावा या मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सरपंच संतोष मढवई, साईनाथ मढवई, प्रमोद देवडे, बाबासाहेब शिंदे, सुरेश मढवई, दीपक पाटील,  प्रमोद पाटील, दिलीप मढवई, बशीर शहा, राजेंद्र घोटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने