तिसरे आपत्य असतांना पद वाचवण्यासाठी बाळाच्या जन्म नोंदी मध्ये खाडाखोड करणाऱ्यास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुमारे १४ वर्षांनी येवला न्यायपालिकेचा निकाल
तिसरे आपत्य असतांना पद वाचवण्यासाठी बाळाच्या जन्म नोंदी मध्ये खाडाखोड करणाऱ्यास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा 
सुमारे १४ वर्षांनी येवला न्यायपालिकेचा निकाल 

येवला -प्रतिनिधी
 येवला नगर परिषदेच्या २००१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसरे आपत्य असून सुद्धा प्रशासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी चौघांना येवला न्यायालयाने  दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि २० हजारांचा दंड देखील केला 
अधिक माहिती अशी कि ,येवला  नगर परिषदेच्या २००१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यातआल्या होत्या यात प्रभाग क्र १ मधील नगरसेवक म्हणून निवडून आलेले शेख बिलाल बाबुभाई यांनी आपले तिसरे आपत्य असून देखील निवडणूक लढविली मात्र येवला येथील तक्रारदार नागरिक योगेश जग्गनाथ सोनावणे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी श्री महेश झगडे यांच्या कडे चौकशी कमी अर्ज दाखल केला होता त्यानुसार चौकशी करून  शेख याना नगरसेवक राहण्यास अपात्र ठरवले होते या निकाल विरोधात बिलाल शेख यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते मात्र तिथे देखील अपील फेटाळले गेल्याने सदर प्रकरण येवला न्यालयात दाखल करण्यात आले त्या पूर्वी  शासकीय अभिलेख मध्ये खाडाखोड केल्याने येवला न.पा चे तत्कालीन मुख्यअधिकारी श्री ढाकरे यांनी दि १मार्च २००४ रोजी येवला शहर पोलिसांत तक्रार दिली होती त्या नुसार   आरोपी शेख बिलाल बाबुभाई ,शेख नसरीन बिलाल ,नसीम शेख मुजीब ,मुमताज शेख समसु,डॉ एल एल जाधव,,दिलीप नानासाहेब आम्ले ,आणि सरस्वती हिरामण तुंभारे, या एकूण ७ आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र यात आरोपी डॉ एल एल जाधव यांच्या वर कार्यवाही करताना पोलिसांनी सक्षम अधिकारी यांची परवानगी न घेतल्या मुळे त्यांना दोषमुक्त करण्यात आले होते उर्वरित सहा आरोपी विरोधात  न्यायालयात केस सुरु होती या केस चा निकाल सुमारे १४ वर्षांनी देताना न्यायालयाने  एकूण सहा आरोप पैकी मुख्य आरोपी शेख बिलाल बाबुभाई,शेख नसरीन बिलाल,शेख नसीम मुजीब ,मुमताज शेख समसू याना दोषी ठरवत दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व २० हजारांचा दंड ठोठावला यात आरोपी दिलीप आम्ले व सरस्वती तुंभारे यांची निर्दोष मुक्तता केली सादर  प्रकरणात सरकारी पक्षा तर्फे अभियोक्ता आनंद वैष्णव यांनी काम पहिले प्रकरण चालवताना लिपिक मेढे सह पैरविअधिकारी ए आर पागिरे,महिला पो कॉ उषा आहेर ,गीता शिंदे  यांनी मदत केली 

थोडे नवीन जरा जुने