संभाजीराजे पवार यांनी स्वखर्चातुन पूर्ण केले कुसमाडी ते हडपसावरगांव शिवरस्त्याचे काम



संभाजीराजे पवार यांनी स्वखर्चातुन पूर्ण केले कुसमाडी ते हडपसावरगांव शिवरस्त्याचे काम

 


येवला : प्रतिनिधी

कुसमाडी ते हडपसावरगांव शिवरस्त्याची रया गेल्याने या परिसरातील दोनशेवर शेतकऱ्यांची सातत्याने हाल सुरु होती. मात्र एक किलोमीटर रस्त्याचे मजबुती करणाचे रस्त्याचे काम पंचायत समितीचे माजी सभापती शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी स्वखर्चातुन पूर्ण केले.यामुळे या शिवरस्त्याला झळाली मिळाली असून शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.

या परीसरात २०० च्या आसपास शेतकरी कुटुंब असुन स्वातंत्र्योत्तर काळापासुन या शिवरस्त्याची अतिशय दैन्यअवस्था झाली होती.पावसाळ्यात परीसरातील शेतकर्यांना आपला शेतमालने आण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.पावसाळ्यात तर शेतातून मुख्य रस्त्यावर जाण्याची कसरत होत होती.किंबहुना कुणाला उपचारासाठी दवाखान्यात न्यायचे असल्यास सर्व पर्याय खुंटत होते.परीसरातील शेतकर्यांसह जायदरे गावातील लोकांना दळनवळनासाठी येवला -मनमाड मार्केटला शेतमाल घेउन जान्यासाठी जायदरे-कुसमाडी मार्गे हाच रस्ता जवळचा आहे.मात्र या रस्त्याने कुठलेही जड वाहन नेता येत नव्हते.

हि सर्व अडचण शेतकऱ्यांनी संभाजीराजे पवार यांच्याकडे मांडली.यावर पवार यांनी तत्काळ या कामासाठी लागणारी यंत्रणा ऊपलब्ध करुन दिली आणि हे काम पूर्ण केले.रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन माजी सरपंच बाळासाहेब पवार यांनी केल. आज परीसरातील शेतकर्यांनी संभाजीराजे पवार यांचा सत्कार करून अनेक वर्षाचे काम पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त केले. शिवरस्त्या लगतचे शेतकरी दत्तु देवरे,नारायन जाधव,वसंत पवार,चांगदेव भोईटे,गोरख कोल्हे,

तावबा पवार,सुभाष गोराडे,चंद्रभान कोल्हे,भागिनाथ पवार,नाना पवार,भाऊसाहेब पवार,देवराम पवार, रघुनाथ गाढ़े,भाऊसाहेब पवार,विकास घोडेस्वार,अमोल मोरे,रामकीसन घुले,सुर्यभान घुले,नारायन जाधव,आशोक पवार,भगवान गायकवाड,रघुनाथ साठे,नाना गायकवाड,भिमा शिंदे,विश्वनाथ पवार,दत्तु गाढ़े,ज्ञानेश्वर पवार,बळवंत शिंदे,अशोक पवार,वसंत पवार,छोटीराम पवार,रमन मोरे आदींनी यासाठी पुढाकार घेतला.



 11/22/18, 4:38:02

थोडे नवीन जरा जुने