येवल्याच्या विश्वजित लोणारीस कांस्यपदक
येवल्याच्या विश्वजित लोणारीस कांस्यपदक 


वर्धा येथील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा  

येवला : प्रतिनिधी

     शहरातील कै. धोंडीराम वस्ताद तालिम संघाचा मल्ल तथा 'डी पॉल' इंग्लिश मेडियम स्कूलचा विदयार्थी विश्वजित प्रविण लोणारी याने महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या संयुक्त विदयमाने वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या ७५ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. 
  
      २८ ते ३० नोव्हेंबर या काळात वर्धा येथे वयोगट १४ वर्षे आतील मुले व मुलींची हि राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत नाशिक विभागाकडून सहभागी झालेल्या येवला येथील विश्वजित लोणारी याने हि नेत्रदीपक कामगिरी केली. विश्वजित लोणारी यास कांस्यपदकासह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विश्वजित याने नंदुरबार येथील नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत आपल्या ७५ किलो वजन गटात बाजी मारत राज्य शालेय कुस्ती स्पर्धेसाठी प्रवेश केला होता.विश्वजित यास तालीम संघाचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजेंद्र लोणारी, महाराष्ट्र चॅम्पियन विजय लोणारी,प्रविण लोणारी,रामेश्वर भांबारे यांच्यासह तालीम संघाचे पैलवान रामदास दराडे,प्रभाकर ठाकूर,भिमराज नागपुरे,राजकुमार कासार,खालिद शेख,दिपक लोणारी,भोलानाथ लोणारी यांच्यासह 'डी पॉल' शाळेचे प्राचार्य जोमी जोसेफ,उपप्राचार्य फादर सॅंटो थॉमस,क्रीडाशिक्षक लकी सर,सचिन पगारे आदींचे मार्गदर्शन लाभले.

थोडे नवीन जरा जुने