येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जनसंपर्क अभियानास सुरुवात

 येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जनसंपर्क अभियानास सुरुवात
येवला : प्रतिनिधी

विश्वासघातकी, जुलमी, भ्रष्ट, अशा मोदी व फडणवीस सरकारला जनता खाली खेचल्याशिवाय राहणार नाही अशी सडकून टीका काँग्रेस कमिटीचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केली ते येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येवल्यात जनसंपर्क अभियानाचे उदघाटन प्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित जनसंपर्क अभियानाचे उदघाटन पानगव्हाणे यांचे हस्ते करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यात काँग्रेस पक्षाचा मोलाचा वाटा असून देशाचा जडण घडण विकास हा  झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष ऍड. समिर देशमुख यांनी प्रास्ताविक सादर करताना जनसंपर्क अभियान संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार तालुक्यातील प्रत्येक गावातील घरा घरात जाऊन काँग्रेस पक्षाने केलेल्या कार्याची व योगदानाची माहिती जनतेपर्यंत पाहोचवणार असून यासाठी गाव तेथे शाखा स्थापन करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते अरुण आहेर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर डॉ. नीलम पटणी यांची डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांना पानगव्हाणे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी रश्मी पालवे, डॉ.विकास चांदर, नानासाहेब शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केले तर आभार दत्तात्रय चव्हाण यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमास रमेश कहांडोल, भारत टाकेकर, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तात्या लहरे, जरार पहिलवान, अनिल खैरे, फारूक चमडेवाले, राजेंद्र गणोरे, नानासाहेब शिंदे, उस्मान शेख, संदीप मोरे, आबासाहेब शिंदे, महादू सोळसे, रावसाहेब लासूरे, बद्रीनाथ कोल्हे, मुसा शेख, लहानेश्वर पुणे, दत्ता काळे. एकनाथ गायकवाड, अण्णासाहेब पवार, शरद लोहोकरे, विलास नागरे, दत्तात्रय चव्हाण, केशव देशमुख, धनंजय पैठणकर, बाळासाहेब सोनवणे, अनिल पगारे, इकबाल पटेल, भाऊराव दाभाडे, सुकदेव मढवई, शिवनाथ खोकले, दत्तू भोरकडे, दौलत पाटोळे, आशा झाल्टे, अर्चना शिंदे, बाळासाहेब पारखे, आदी उपस्थित होते.
 

थोडे नवीन जरा जुने