मुक्तीभुमीवर तथागत भगवान बुद्ध यांची 2566 वी जयंती उत्साहात साजरी

 मुक्तीभुमीवर तथागत भगवान बुद्ध यांची 2566 वी जयंती उत्साहात साजरी
येवला : पुढारी वृत्तसेवा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभुमी स्मारक येवला याठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मुक्ती भूमी स्मारकाच्या व्यवस्थापिका तथा संशोधन अधिकारी श्रीमती पल्लवी पगारे यांच्या हस्ते तथागतांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुगंधी पूजा सायगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक भाऊसाहेब आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बार्शीले यांनी पुष्प अर्पण केले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ज्यांना बाबासाहेबांचा सहवास तथा मार्गदर्शन लाभले त्या मातोश्री श्रीमती जनाबाई साळवे (भैलुमे)या उपस्थित होत्या.यावेळी त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना परित्राण पाठ पूजा विधी चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते व मुक्तीभुमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . व पर्यटकांना प्रत्येकी एक वृक्ष लावण्यासाठी भेट म्हणून स्मारकाच्या वतीने  देण्यात आले . मुक्तीभूमी स्मारक या ठिकाणी येवला शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथून तथागत भगवान बुद्धांची मिरवणूक रथ उपस्थित झाला .यावेळी त्या संयोजकांचे स्वागत श्रीमती पल्लवी पगारे व पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे यांनी केले.परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे विधी संचालन पंचम साळवे यांनी केले. यावेळी बाळासाहेब पगारे ,पंकज पगारे ,त्रिशाला पगारे ,भगवान साबळे , अशोक केदारे आकाश आहिरे समाधान गरुड महेंद्र गरुड अतिश पठारे मंगेश साबळे छाया साबळे अनिता चंदनशिव नंदा साठे
थोडे नवीन जरा जुने