भारतीय जनता पार्टी यांच्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून रास्ता रोको

भारतीय जनता पार्टी यांच्या  महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून रास्ता रोको 

 येवला  : पुढारी वृत्तसेवा

शहरातील विंचूर चौफुली येथे भाजप कार्यकर्त्यानी रस्त्यावर एकत्र जमून विकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला यामुळे काही वेळ नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको करू नये म्हणून शहर पोलिसांच्या वतीने महिला पोलिसांचा कडा तयार करण्यात आला होता.
मध्य प्रदेश सरकारने 90 दिवसात इम्प्रिकल डाटा तयार करू सुप्रीम कोर्टात सादर केल्याने मध्यप्रदेश मध्ये राजकीय आरक्षण अस्तित्वात आले आहे
याउलट महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने एम्पिरिकल डाटा विषयी केवळ चालढकल केल्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षण संपुष्टात आला आहे ओबीसी समुदायाचे नुकसान झाले आहे याचा निषेध करण्यासाठी 
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री ओबीसी मोर्चा शंकरराव वाघ, जिल्हाअध्यक्ष भाजप ग्रामीण संजय शेवाळे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा निषेध मोर्चा व रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, संतोष काटे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस,केदारनाथ वेलांजकार तालुका अध्यक्ष ओबीसी मोर्चा,यांच्या  सह संतोष केंद्रे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,चेतन धसे,मनोज दिवटे,बापू गाडेकर,सुनील काटवे, आदी सह महिला कार्यकर्त्या उपस्थीत होते
थोडे नवीन जरा जुने