भारम विकास सोसायटी चेअरमनपदी दत्तात्रय सोमासे तर व्हा चेअरमन पदी नवनाथ सोमासे यांची बिनविरोध निवड

भारम विकास सोसायटी चेअरमनपदी दत्तात्रय सोमासे तर व्हा चेअरमन पदी नवनाथ सोमासे यांची बिनविरोध निवड

येवला : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील पूर्व भागातील भारम ,डोंगरगाव ,वाघाळे , कोळम खुर्द व कोळम बुद्रुक या पाच गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या भारम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दत्तात्रय    वेणुनाथ सोमासे तर व्हा चेअरमन पदी नवनाथ   दगू सोमासे यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत  ज्येष्ठ नेते त्र्यंबकराव सोमासे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने १३पैकी १२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता .  चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणुकीसाठी विशेष सभा येवला येथे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस टी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत चेअरमन पदासाठी दत्तात्रय सोमासे यांचा तर व्हा चेअरमन  पदासाठी नवनाथ सोमासे यांचे एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. याप्रसंगी संचालक उत्‍तम बाबुराव सोमासे,  ,पुंडलिक चंद्रभान आवारे ,जयराम तुकाराम सोमासे , शेषराव पुंजाबा आवारे, शिवाजी नारायण येवले,  बाळनाथ पर्बत सोमासे, श्रावण गोविंदा सोमासे  , संजय शिवाजी गोराने  ,माधव देवका पगारे, शिनाबाई सिताराम राऊत उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार खात्याचे  लेखापाल एस. टी. शिंदे यांनी  काम पाहिले तर   सचिव आर. एस. गांजे व  लिपिक परसराम आरखडे यांनी त्यांना   सहकार्य केले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी
पॅनलचे नेते त्र्यंबकराव सोमासे यांनी प्रयत्न केले.  याप्रसंगी एकनाथ सोमासे, बाळासाहेब सोमासे, नंदूआबा सोमासे,  बापू सोमासे, कृष्णा पगारे, आसाराम पगारे,   दत्तू सोमासे, मोतीराम सोमासे, सोमनाथ सोमासे,  बाळासाहेब आवारे ,जालिंदर चव्हाण, सिताराम आवारे, गंगाराम आवारे, भागिनाथ चव्हाण, साईनाथ ढोकळे, रमेश आवारे, आबासाहेब आहेर, समाधान सोमासे, सुनील सोमासे, ज्ञानेश्वर आवारे, अनिल पगारे, फकीरा  पगारे, बाळू गांजे, रामभाऊ आवारे ,बाळासाहेब चव्हाण ,रमेश आवारे, कृष्णा पवार, अरुण  जानराव, संजय गोराणे, दत्तू सोमासे, विठ्ठल सोमासे संतोष राऊत, आदींसह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने