एस.एन.डी. महाविद्यालयात युवा महोत्सवात तरुणाईची धूम!
येवला,ता.२१ : गेले दोन वर्ष महाविद्यालयाची स्नेहसंमेलने विस्कळीत झाली होती.मात्र त्याची कसर यंदा विद्यार्थी भरून काढत असून येथील एस.एन.डी. कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक निनाद युवा मोहत्सावांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा सह डेची धूम करून आनंद लुटला.
महाविद्यालयाचे दुसरे सेमिस्टर सुरू असून यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य एस.टी. खैरनार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून निनाद युवा महोत्सवाचे उद्घाटन झाले.युवा महोत्सवात विद्यार्थांच्या कलागुणांना तसेच त्यांच्या प्रतिभेला चालना मिळावी याहेतूने याअंतर्गत विदयार्थ्यांनी विविध पोशाक परिधान करून वेगवेगळ्या कलाकारांचे,संतांचे,देवदेवतांचे विचार आपल्या अभिनयातुन सादर करून विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे विचार पोहचविण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांनी टाय,फेटा,साडी तसेच ट्रॅडिशनल डे मध्ये देखील सहभाग घेतला. दक्षिण भारतीय पोशाखातून विद्यार्थ्यांनी संस्कृतीचे दर्शन घडविले.निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,प्रश्न मंजुषा यातुन विद्यार्थांच्या वैचारिक व बौद्धिक गुणांचा विकास होण्यास मदत झाली. त्यांच्यामध्ये संभाषण,भाषण कौशल्य विकसित होण्यास मदत झाली.
प्राचार्य प्रा.खैरनार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय प्रयत्न करत आहे.विदयार्थ्यांमधील सुप्त गुण व त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम वर्षभर आयोजन करण्यात येत असुन त्यामध्ये विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत आहे.महाविद्यालय विदयार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करत आहे असा संदेश आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
सूत्रसंचालन प्रा.दीपक मढवई यांनी केले.विभागप्रमुख प्रा.एम.व्ही.बनकर,प्रा.एल के.घाडगे, प्रा.जे.एस.थोरात व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सहभागी झाले.सांकृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा.जी.बी.धनगे यांनी आभार मानले.
येवला : एस.एन.डी. महाविद्यालयात युवा महोत्सवात वेशभूषा करून सहभागी झालेले विद्यार्थी.