मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर उतरला आनंद भाव बाबा डमाळे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरानंतर
 रुग्णांच्या चेहऱ्यावर उतरला आनंद भाव
बाबा डमाळे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
        
           अंदरसुल ;
बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत चालू असलेला शस्त्रक्रिया शिबिरमुळे सर्वसामान्य -गोरगरीब व सर्वच जातीधर्माच्या लोकांना सेवाभावी वृत्तीने दृष्टी प्रदान केली जात आहे हा उपक्रम राबवला नसता तर अनेक गोरगरीब व वृद्ध उपचारा विना राहिले असते म्हणून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साबरे यांनी केले डमाळे मित्रमंडळातर्फे तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे चालू आहेत.  शिबिरातील नेत्र रुग्णांच्या पुणे येथील एच. व्ही. देसाई रुग्णालयातून यशस्वी शस्त्रक्रिया करून आल्यानंतर त्या रुग्णांचे स्वागत अंदरसूल येथे डॉ. तुषार भागवत हॉस्पिटल येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साबरे यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी बाबासाहेब डमाळे पाटील यांनी प्रथम नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचे दर्शन घेतले तर पत्रकार साबरे, डॉ. सुदामराव भागवत,डॉ.तुषार भागवत यांच्या हस्ते प्रत्येक रुग्णांना साईबाबांच्या आरतीची शिडी भेट देण्यात आली. रुग्णांनी बाबासाहेब डमाळे यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला तर मोफत शस्त्रक्रिया नंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद भाव दिसून येत होता याप्रसंगी कारभारी धुमाळ, रामराव उसरे,दगु चव्‍हाण, भाऊसाहेब कोटमे ,राजेश चव्हाण, बापू भोरकडे, विठ्ठलराव कुलभैया, वाल्मीकराव खोकले, शांताराम जमधडे, बाळासाहेब दाभाडे,बबनराव कुमावत, छबुराव कुमावत, रंजनाबाई दाभाडे, गंगुबाई मगर, रुक्मिणीबाई दाभाडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उर्वरित शस्त्रक्रिया करिता त्या त्या भागातील रुग्णांकरिता तारखा देण्यात आलेले आहेत अशी माहिती रोहण डमाळे यांनी दिली.  आभार वृशाल डमाळे यांनी मानले.
फोटो;अंदरसुल;मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरानंतर घरी परतलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर उतरला आनंद भाव 
थोडे नवीन जरा जुने