पवार यांना भाषण करण्याची अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून आंदोलन


पवार यांना भाषण करण्याची अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून आंदोलन

येवला- पुढारी वृत्तसेवा

येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना भाषण करण्याची अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
  मंगळवार दिनांक 14/06/2022 रोजी देहू येथे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजित दादा पवार यांना भाषण करण्यासाठी दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयाने अनुमती नाकारली पण विरोधी पक्ष नेत्यांना मात्र भाषणाची संधी दिली यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते म्हणून  अजित दादांचा आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा जाणूनबुजून अपमान केला गेला आहे.म्हणून 
 भाजपच्या केंद्र सरकारच्या सदर दडपशाहीचा येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी विंचूर चौफुली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमून पुतळ्याला पुष्पहार घालून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी येवला शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष राजश्री पहिलवान,उपाध्यक्ष नीता बिवाल,समीना शेख,अल्का जेजुरकर,निर्मला थोरात,नर्गिस शेख,विमल शहा,आशा काबरा,सीताबाई खलसे,आशा सातभाई,मंगल राकसे,नाझमीत शेख,इरफान शेख,रुकसना शेख,शबाना शेख,बिलकीस पठाण,अनिता लोंढे,दिपाली खैरनार,लता ताठे,सोनाली शिंदे,मंगल खैरनार,ताईबाई शिंदे,शकुंतला गायकवाड,मीराबाई खैरनार,ताराबाई शिंदे आदी महिला मोठा संख्येने उपस्थित होत्या.तसेच विक्कीभाई बिवाल व सचिन सोनवणे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने