अनकाई किल्ल्यावर महायान पंथाच्या दुर्लक्षित लेणी समूहात तेविसावी कार्यशाळा उत्साहात संपन्न

अनकाई किल्ल्यावर  महायान पंथाच्या दुर्लक्षित लेणी समूहात  तेविसावी कार्यशाळा  उत्साहात संपन्न

येवला : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील अनकाई किल्ल्यावर  तेविसावी कार्यशाळा अतिशय शांततेत  १०० अभ्यासकांच्या उपस्थितीत संपन्न झाली,

ह्या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातुन धम्मलिपि अभ्यासक  सहभागी झाले होते,
खरे तर संपूर्ण महाराष्ट्रात  वेरूळ, पितळखोरा, घटकोत्कच, अजिंठा, विद्यापीठ, शिवनेरी, जुन्नर , मुंबई, रायगड  या ठिकाणी  बुद्ध लेणींचा हजारोचा  मोठा लेणी  समूह आपल्याला लाभला आहे. परंतु हजारो वर्षांचा इतिहास उलगडून सांगायला मार्गदर्शक असे कोणीच नव्हते. पण हल्ली ही चळवळ गतिमान झाली असून महाराष्ट्रातील प्रत्येक लेणींवर हल्ली कार्यशाळा होत आहे, 
अनेक संघटना यात निस्वार्थी भूमिकेतुन कार्य 
करत आहे, बुधवारीअनकाई किल्ल्यावर वरच्या माथ्यावर दुर्लक्षित असलेल्या महायान व वज्रयान मिश्र पंथीय लेणी समूहात कार्यशाळा भरवण्यात आली, 
त्याअगोदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेणींची माहिती उपस्थितले विद्यार्थ्यांना देण्यात आली,  लेण्यांच्या निर्मिती मागील इतिहास, तत्कालीन सामाजिक संरचना, कालखंडानुसार अतिक्रमणे, शिल्पांचा अर्थबोध, धम्मलिपि इत्यादी माहिती  कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना  देण्यात आली, शिल्पकला , शिलालेख संशोधनाची अपूर्ण  भूक आता आणखी वाढलीय हे असे मनोगत  अनेक धम्मलिपि विद्यार्थ्यांनी  व्यक्त केले. कार्यशाळेतील सर्व धम्म बांधव भगिनी यांचे लेण्यांचा इतिहास समजून घेण्याची धडपड कार्यशाळेच्या माध्यमातून दिसत होती.
नागपूर, परभणी, जालना, धुळे, मुंबई, भुसावळ, जळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,  पुणे, कोल्हापूर इत्यादी शेकडो किमी अंतराहुन या अभ्यासकांना अनकाई लेणी व किल्ल्याची ओढ लागावी हे अत्यंत गौरवास्पद आहे. आपला नष्ट होत असलेला इतिहास, बुद्ध लेणींवर होत असलेले अतिक्रमणे या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्या दूर्लक्ष झाल्याने होत आहेत. हे थोपवण्याचे कार्य आता _दान पारमिता फाउंडेशन_ अंतर्गत असलेल्या *MBCPR* टीमच्या माध्यमातून सुरू झाले आहे , आणि ही चळवळ आता जोम धरू लागली आहे.
प्रत्येक कार्यशाळेत जाऊन धम्म समजून घेण्याची इच्छा आकांक्षा सगळीकडे निर्माण होत आहे,
कार्यशाळेची सुरवात त्रिसरण पंचशील घेऊन करण्यात आली, 
त्यानंतर 10 मिनिटे आणापान घेतले गेले ,
सूत्रसंचालन कविता खरे यांनी केले,  अनकाई किल्ल्याचा इतिहास गौतम कदम यांनी सांगितला,  अनकाई किल्ल्यावर पहिल्या दरवाजा जवळ असलेल्या लेणी  समूहाची संपूर्ण शिल्पकलेची माहिती तसेच त्रिमुखी असलेलं महायानी व वज्रयानी पंथाच्या शिल्पकले बाबतीत माहिती सुनील खरे यांनी दिली,  
तीन मुखी शिल्प हे मंजुश्री बोधीसत्व , बोधीसत्व अवलोकितेश्वर, व बुद्ध यांचे प्रतीक समजले जाते, तर बुद्ध धंम संघ याचे देखील प्रतीक समजले जाते, ही लेणी इस ७ व्या ते ८ व्या शतकाच्या प्रारंभी झाली असून ह्या लेणींची नोंद पुरातत्व विभागाकडे देखील नाही,  त्यामुळे MBCPR टीम ह्या ठिकाणी डाक्युमेंटशन बनऊन पुरातत्व विभागास सादर करणार आहे, 

यावेळी सकाळच्या  अल्पोहाराची , चहाची व्यवस्था रेखा खंडिझोड यांनी की तर जेवणाची व्यवस्था मुकुंद आहिरे व राजू परदेशी त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट केली ,  
  
मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन व रिस्टोरेशन संस्थेच्या माध्यमातून येथे धम्म लिपि वर्ग भरवण्यात आला, 
त्यास मोठ्या संख्येने उपासक उपस्थित होते, 
टीमची वाटचाल विकास खरात सरांनी मांडली, आभार प्रदर्शन संतोष आंभोरे यांनी केले.

अनकाई लेणीची झालेली दुरवस्था, अस्वच्छता व किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली बघून सर्व विभागातील लेणी अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्र पर्यटन मंत्री व भारतीय पुरातत्व विभाग यांचे कडे याविषयी MBCPR लवकरच पाठपुरावा करणार असल्याचे MBCPR तर्फे अभ्यासकांना सांगण्यात आले.
यावेळी राहुल खरे, विकास खरात, गौतम कदम, सुरेश कांबळे, सतीश पवार, राजू लहिरे, राजेश सोनवणे, जागृती तुपारे, जया बाविस्कर,  प्रवीण जाधव, विजय कापडणे, संतोष आंभोरे,   कविता खरे, मोहन सरदार,  किरण केदारे, इत्यादी अभ्यासक उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने