आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यासाठी भर पावसात एकलव्य आदिवासी परिषदेचे ठिय्या आंदोलन-
पुढारी वृत्तसेवा
एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आदिवासी भिल्ल समाजासाठी फक्त आधार कार्ड गाव पंचनामाच्या आधारे आदिवासी भिल्ल समाजाला जातीचे दाखले, रेशन कार्ड, निराधार योजना,, श्रावण बाळ योजना अपंग योजना, घरकुल योजना, एकलव्याच्या पुतळ्यासाठी येवला येथे जागा उपलब्ध करणे, ऑनलाइन रेशन कार्ड नियमित करणे, तसेच महालखेडा येथील पुरग्रस्त आदिवासी बांधवांना तात्काळ राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या अशा अनेक मागण्यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले
या आंदोलनासाठी तालुकाध्यक्ष समाधान पवार, युवा तालुकाध्यक्ष अनिल माळी यांनी अतिशय मेहनत घेतली तर कोटमगाव, महालखेडा, पाटोदा, पिंपरी, नगरसुल अंदरसुल, जाय दर, गुजरखेडा येथील शेकडो युवक महिला उपस्थित होत्या तसेच प्रमुख पदाधिकारी विजय कंक, चंदर पवार, सागर वाघ, संजय पवार, भगवान मोरे, नवनाथ वाघ, दीपक माळी, राहुल डगळे, संदीप ठाकरे, अमोल आहेर, अमोल पवार, शरद माळी, रमेश मोरे आडी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
हे आंदोलन भर पावसात तहसील कार्यालय समोर चालल्याने तात्काळ पोलीस तहसील प्रांत अधिकारी यांनी दखल घेत तात्काळ मागण्या पूर्ण केल्याचे तहसीलदार यांनी पत्र दिल्याने हे आंदोलन संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी मागे घेतले.