भुसावळ-पंढरपूर रेल्वेचे येवला रेल्वे स्टेशन येथे भाजपा कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत..



भुसावळ-पंढरपूर रेल्वेचे येवला रेल्वे स्टेशन येथे भाजपा कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत..

येवला - पुढारी वृत्तसेवा

 रेल्वे मंत्रालयाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांसाठी भुसावळ ते पंढरपूर या विशेष रेल्वे गाडीचे नियोजन केले होते सदर विशेष रेल्वे ही येवला मार्गे पंढरपूर साठी जाणार होती मात्र या रेल्वेला येवला रेल्वे स्टेशनवर थांबा नाकारण्यात आला होता
ही बाब भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चे जिल्हाअध्यक्ष तसेच रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर समदडिया  यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन तसेच केंद्रीय कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्याशी संपर्क साधून येवला रेल्वे स्थानकावर वारकऱ्यांसाठी या गाडीला थांबा द्यावा अशी मागणी केली या मागणीची त्वरित दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने या विशेष रेल्वेला येवला स्थानकात पाच मिनिटांचा थांबा दिला
दरम्यान भुसावळ पंढरपूर ही विशेष रेल्वे येवला रेल्वे स्थानकात येताच  येथील वारकऱ्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला
रेल्वेच्या दोन्ही चालकांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला तसेच रेल्वेत आलेल्या प्रवाशांसाठी पाणी पाऊच आणि नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती
रेल्वे स्थानकातील या स्वागत समारंभासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर समदडिया, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, ओबीसी मोर्चा चे सरचिटणीस राजू सिंग परदेशी, तालुका संघटन सरचिटणीस प्राध्यापक नानासाहेब लहरे, बुनकर आघाडीचे मनोज दिवटे, संतोष काटे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, रितेश बुब भाजपा व्यापारी आघाडी चे शहराध्यक्ष हेमचंद्र समदडिया, सौरव घोडके. मुकेश भावसार. ओंकार घोडके. समीर शेख आदि पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने