मोकाट कुत्र्यांनी घेतला राष्ट्रीय पक्षी मोराचा बळी

मोकाट कुत्र्यांनी घेतला राष्ट्रीय पक्षी मोराचा बळी

येवला : पुढारी वृत्तसेवा

हरीण काळवीट या सर्व वन्य जीवासाठी प्रसिद्ध असलेल्या येवला तालुका उत्तर पूर्व भागामध्ये वन्यजीवांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची नेहमी दिसत असते . वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात राष्ट्रीय पक्षी मोर याचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मोकाट कुत्र्यांनी रेंडाळे तालुका येवला येथील वन विभाग हद्दी लगत राष्ट्रीय पक्षी मोरावर प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये मोराच्या मानेला मोठ्या प्रमाणावर खोलवर जखमा झाल्या होत्या परिणामी या ठिकाणी मोर मृत्युमुखी पडला.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून हरीण  काळवीटांसह मोरांवर मोठ्या प्रमाणावर हे मोकाट कुत्रे हल्ले चढवितात. 
वनविभागाने या विषयाकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे परिसरात एकही वन कर्मचारी कधीही फिरताना दिसत नाही असा आरोप येथील वन्यजीवांसाठी सातत्याने कार्यरत असलेले समाजसेवक प्रवीण आहेर यांनी केला आहे.
थोडे नवीन जरा जुने