अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आमदार किशोर दराडेसह आमदारांची रविवारपासून पुणे ते मुंबई पायी दिंडी





<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2114852490196880"       crossorigin="anonymous"></script>
अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आमदार किशोर दराडेसह आमदारांची रविवारपासून पुणे ते मुंबई पायी दिंडी 

येवला  : न्यूजप्रेस वृत्तसेवा
शाळांना घोषित करून  शंभर टक्के अनुदान द्यावे,जुनी पेन्शन लागू करावी यासह राज्यातील शिक्षकांच्या समस्याची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी शिक्षक आमदार रविवारपासून पुणे ते मुंबई पायी दिंडी काढून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली.

रविवारी (ता.११) पुणे येथून मुलींची पहिली शाळा भिडे वाडा दगडूशेठ हलवाई मंदिर समोरहून पायी दिंडीची सुरुवात होणार आहे.या आंदोलनाचे नेतृत्व नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे,कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील,अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे,पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत या चार आमदारांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडीचे आयोजन केले आहे.
शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत असून सरकार बदलले तरी प्रश्न जैसे थे आहे.त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी दिंडी पुण्यावरून मुंबईला जाणार आहे.शासन स्तरावर ३ हजार ९६९ शाळा,वर्ग व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या आहे.या तुकड्यांवरील २१ हजार ४२८ कार्यरत शिक्षकांना निधीसहित घोषित करून शंभर टक्के अनुदान द्यावे,त्रुटी पूर्तता केलेल्या शाळेचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करावा,विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षकांना शासन निर्णय १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय लागू करून अनुदान द्यावे,विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षणाचा शासन निर्णय निर्गमित करणे,ज्युनियर कॉलेजच्या वाढीव पदांना मान्यता देऊन अनुदान लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागण्या शासनाने मान्य करून राज्यातील विनाअनुदानित शिक्षक हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक कायमचा पुसून शिक्षकांना न्याय द्यावा. या मागणीसाठी हे आंदोलन हाती घेतल्याचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.

शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढील काळात मोठ्या प्रमाणात शिक्षक जन आंदोलन करण्यात येईल.शिक्षकाला समाजामध्ये मानाचे स्थान असूनही शिक्षकाला आज वेतनाअभावी रोजंदारी व शेतात मजुरी करण्याची वेळ येत आहे.काही शिक्षकांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. आपल्या पुरोगामी विचारांच्या फुले,शाहु आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शिक्षकांना अशी वेळ येणे ही लाजिरवाणी बाब आहे असून वर्षानुवर्ष प्रत्यक्ष तील आमच्या शिक्षकांना न्याय मिळण्याची गरज असल्याचे दराडे यांनी म्हटले आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे शिक्षकांचे प्रश्न समजून घेऊन यामध्ये मार्ग काढतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.पुणे ते मुंबई मंत्रालय पायी दिंडीसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक बांधवांनी सहभागी होवून आपला प्रश्न मार्गी लागला पाहिजे यासाठी यावे व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे व पायी दिंडीमध्ये सामील व्हावे असे आवाहन आमदार दराडे यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने