गावकामगार पोलीस पाटील संघाच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी अरुण पाटील बोडके यांची निवड

गावकामगार पोलीस पाटील संघाच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी  अरुण पाटील बोडके यांची निवड

येवला : पुढारी वृत्तसेवा

 नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघाची कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली यात जिल्हा अध्यक्ष म्हणून निफाड चे पोलीस पाटील अरुण पाटील बोडके ,सचिव पदी रविंद्र पाटील जाधव तसेच उपाध्यक्ष पदी श्री बेंडकुळे व चौधरी पाटील यांची निवड करण्यात आली.
दिनांक ५ सप्टेंबर रोजी पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष   बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम मध्ये ही निवड करण्यात आली.

 यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच   संपत पाटील जाधव चांदवड ,अरुण पाटील महाले पेठ ,खातळे पाटील यांच्या सह जिल्ह्यातील अनेक पाटील उपस्थित होते

याप्रसंगी नूतन अध्यक्ष व पदाधिकारी यांनी येणाऱ्या काळात पोलीस पाटील यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मावळते अध्यक्ष  चिंतामण पाटील मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ पाटील बझेकर यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने