सावरगाव विद्यालयाचे नकुल गोराणे व अर्जुन गोराणे एनएमएमएसच्या गुणवत्ता यादीत चमकलेसावरगाव विद्यालयाचे नकुल गोराणे व अर्जुन गोराणे एनएमएमएसच्या गुणवत्ता यादीत चमकले 

येवला : पुढारी वृत्तसेवा
सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील नकुल गोराणे व अर्जुन गोराणे हे विद्यार्थी एनएमएमएस अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकले आहे.
या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून या विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचे नाव उज्वल झाल्याची प्रतिक्रिया प्राचार्य शरद ढोमसे यांनी व्यक्त केली आहे.या विद्यार्थ्यांना शासनाकडून वार्षिक १२ हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. तसेच समीक्षा डुंबरे व अभिषेक गोविंद हे विद्यार्थी देखील परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.या यशाबद्दल चारही विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा विद्यालयात गौरव करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल संस्थेचे सेक्रेटरी प्रमोददादा पाटील,सहसेक्रेटरी प्रवीणदादा पाटील,माजी सभापती संभाजीराजे पवार,माजी सरपंच प्रसाद पाटील आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य शरद ढोमसे यांच्या हस्ते पालकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक संजय बहिरम,लक्ष्मण माळी,सगुना काळे,उज्वला तळेकर,विकास व्यापारे यांचे देखील अभिनंदन करण्यात आले.वसंत विंचू यांनी सूत्रसंचालन केले तर भाग्यश्री सोनवणे यांनी आभार मानले.

सावरगाव : एनएमएमएस परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थी व पालकांच्या सत्काराप्रसंगी प्राचार्य शरद ढोमसे व पालक.
थोडे नवीन जरा जुने