शिरसगाव लौकी येथे शेतकऱ्याची कांदाचाळच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या





शिरसगाव लौकी येथे  शेतकऱ्याची कांदाचाळच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या

येवला : पुढारी वृत्तसेवा
  येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी या ठिकाणी शेती पिकाचे नुकसान झाले म्हणून आणि शेतीत परवडत नसल्याने इंद्रजीत विश्वजीत चव्हाण वय 28 या शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे.

अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील शिरसगाव लौकि  या ठिकाणी निवृत्ती बाबुराव जाधव यांचे जावई असलेले इंद्रजीत विश्वजीत चव्हाण राहणार अंबरनाथ मुंबई व 28 हे आपली सासरवाडी असलेल्या येवला तालुक्यांतील शिरसगाव लौकी या ठिकाणी सासऱ्यांची शेती कसत होते. तसेच सासरे निवृत्ती बाबुराव जाधव यांनी आपल्या मृत्युपत्रात सदरची सर्व शेती आपली मुलगी  इंग्रजीत विश्वजित जाधव यांच्या पत्नी सोनाली इंद्रजीत जाधव यांच्या नावावर जाहीर केली होती.
तेव्हापासून मयत इंद्रजीत चव्हाण हेच शिरसगाव लौकि येथील शेती सांभाळत होते.
दरम्यान त्यांनी आपल्या शेतीमध्ये टोमॅटो मका, कांदे अशी नगदी पिकं घेतली होती. मात्र शेतीमाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच महिन्यापूर्वीच शिरसगाव लौकि या ठिकाणी झालेल्या अती वृष्टी मुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले. या विवचनेतून या  शेतकऱ्यांने घराशेजारी असलेल्या कांदा चाळीत अँगल गळफास घेऊन आत्महत्या केली
असल्याची माहिती मयत इंद्रजीत चव्हाण यांचे सासरे निवृत्ती जाधव यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेची माहिती येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना समजताच तातडीने घटनास्थळी पोलिसांना पाठवून मृतदेह शवविच्छेदन साठी उपजिल्हारुग्णालय येथे पाठवला आहे.
तालुका पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलिस आता करत आहे.
थोडे नवीन जरा जुने