येवल्यात शिवसेनेचा जल्लोष



येवल्यात शिवसेनेचा जल्लोष

येवला : प्रतिनिधी

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्याच्या समर्थनार्थ येवला तालुका शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
येवला येथील विंचूर चौफुली येथे सर्व शिवसैनिक जमवून, हातात भगवे झेंडे घेऊन जय भवानी,जय शिवाजी. संजय राऊत  साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आवाज कुणाचा, शिवसेनेचा.कोण आला रे ,कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा विविध घोषणा देऊन विंचूर चौफुलीवर शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विंचूर चौफुली येथे फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकमेकांस लाडू भरवुन आनंद उत्सव साजरा केला .
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे तालुकाप्रमुख रतन बोरणारे शहरप्रमुख राजेंद्र लोणारी शिवसेना समन्वयक छगनराव आहेर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर माजी सभापती पुंडलिक पाचपुते  किशोर सोनवणे सभापती प्रवीण गायकवाड उपतालुकाप्रमुख चंद्रकांत शिंदे धीरज परदेशी युवा सेना शहरप्रमुख लक्ष्मण गवळी महिला आघाडीच्या शहरप्रमुख दिपाली नागपुरे कमलाबाई दराडे उपतालुकाप्रमुख गणेश पेंढारी अनंता आहेर भागिनाथ थोरात माजी सरपंच साहेबराव बोराडे नितीन दराडे संजय सालमुठे प्रकाश वाघ ऋषिकेश सांगळे रंगनाथ भोरकडे साहेबराव बनकर भाऊराव कुदळ प्रतिक जाधव संतोष गोरे अमित जाधव आदी सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने