हिमाचल प्रदेश मधील विजयाचा येवल्यात काँग्रेस पक्षा तर्फे जल्लोष
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमताचा विंचूर चौफुली, येवला येथे विजय साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथमतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला दिनकर दाणे सर व नंदकुमार शिंदे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच फटाके वाजवून, पेढे वाटून व हालकडी चे गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ६८ पैकी ४० जागा सह स्पष्ट बहुमत मिळाले. हिमाचल प्रदेश मधील विजय हा लोकशाहीचा विजय आहे, देशांमधील परिवर्तनाची ही नांदी आहे. अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शहर कार्याध्यक्ष सुरेश गोंधळी, शहर प्रवक्ते नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, काॅ. भगवान चित्ते, अजिज शेख, बाबासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, सुकदेव मढवई, गणपत शिंदे, दत्तु भोरकडे, मनोहर गुजांळ, राजेंद्र गणोरे, गणेश जगताप, डॉ. दिगंबर गायकवाड, बाबूलाल पडवळ, अशोक नागपुरे, अक्षय शिंदे, गणेश मथुरे, पोपट भोरकडे, अनिल कर्डिले, सतीश जांभळे, रामनाथ मढवई, खंडु खैरनार, सचिन खैरनार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.