मातोश्रीच्या इंडक्शन प्रोग्राममधुन विद्यार्थी झाले फार्मसीशी समरस!

मातोश्रीच्या इंडक्शन प्रोग्राममधुन विद्यार्थी झाले फार्मसीशी समरस!


येवला : पुढारी वृत्तसेवा
धानोरे येथील मातोश्री इंस्टिट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी  इंडक्शन  कार्यक्रमांतर्गत पाच दिवसीय अन्वेषण कार्यक्रम पार पडले.या माध्यमातून फार्मशीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फार्मसीची ओळख होऊ शकली.
बी-फार्मसी प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेता यावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रसिका भालके उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी म्हणून मातोश्री तंत्रनिकेतचे प्राचार्य गितेश गुजराथी उपस्थित होते. यावेळी गितेश गुजराथी यांनी प्रथम वर्ष बी. फार्मसीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.या क्षेत्रातही विद्यार्थी आपले करियर उत्तमरित्या करू शकतात असे त्यांनी सांगितले.प्राचार्य भालके यांनी पालकांनाही मार्गदर्शन करत पाल्याच्या करियरसाठी पालकांनी कशी मदत केली पाहीजे हे सांगितले.फार्मसीमधील करियरच्या अफाट संधी मुलांना सांगितल्या व हि स्वप्न पुर्ण करण्यासाठी मातोश्री इंस्टिट्युट ऑफ फार्मसी  कटीबद्ध राहील याची ग्वाही दिली.काही पालकांनीही शकाचे निरसन केले.
इंडक्शन प्रोगाममध्ये वेगवेगळ्या विभागांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.वेगवेगळे प्रभाग त्यांना दाखवण्यात येऊन विद्यार्थी या वातावरणाशी  समरस करण्यात आले. तसेच ट्रैकिंगसाठी अनकाई किल्ल्याची सफर करण्यात आली.या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक स्वास्थ्य टिकवणे गरजेचे असल्याचा संदेश देण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांसाठी सिन्नर येथील सायटेक लिमिटेड फार्मा येथे औद्योगिक भेट आयोजित करून त्यांना या क्षेत्रातील ज्ञान देण्यात आलेच पण त्यांच्यात अभ्यासक्रमाविषयीचे कुतुहल वाढले .कार्यक्रमाचा शेवट हा फ्रेशर पार्टीने करण्यात आला.प्रा.दिपाली शेगर,प्रा. शितल ठाकरे,प्रा. अजिंक्य पोटे यांनी नियोजन केले.संस्थेचे संस्थापक आमदार किशोर दराडे,कार्यकारी संचालक रूपेश दराडे यांनी सुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

धानोरे : मातोश्री फार्मसी महाविद्यालयाच्या इंडक्शन प्रोग्राममध्ये सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी.
थोडे नवीन जरा जुने