सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या परीक्षेत साई सिद्धी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या परीक्षेत साई सिद्धी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी



येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पारेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या साई सिद्धी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  जागतिक तीस देशांच्या नामांकित शाळांच्या विद्यार्थ्यांसोबत सायन्स ओलंपियाड फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या २०२२-२०२३ च्या परीक्षांमध्ये सर्व विभागात चमकदार कामगिरी केली आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात या परीक्षा शालेय स्तरावर घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकाल 17 जानेवारी रोजी घोषित करण्यात आला असून यात  तीन विद्यार्थी मध्ये शौर्य देवडे याने प्रथम श्रेणी सह गोल्ड मेडल तसेच किंजल बोरणारे हिने द्वितीय श्रेणीसह गोल्ड मेडल आणि अनन्या दराडे हिने तृतीय श्रेणीसह गोल्ड मेडल पटकावले आहे.
 यासह
देवांश प्रसाद अर्णव जगताप यांनी देखील गोल्ड मेडल पटकावले आहे.
सायन्स ओलंपियाडच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात स्पर्धा परीक्षा देण्यासाठी फार महत्त्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांचा पाया या परीक्षांमुळे भक्कम होत असतो
विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या प्राचार्य गर्विता लालवानी, शिक्षिका सोनाली कोटमे, पूजा चोपडा, शिक्षक सारंग पटेल ,सुशील जोशी आदींनी परिश्रम घेतले आहे
याप्रसंगी साई सिद्धी पोद्दार स्कूल येथे संस्थेच्या संचालिका प्रियंका श्रीकांत काकड यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
थोडे नवीन जरा जुने