युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांची पाटोदा येथे सावली संस्थेस भेट.

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांची पाटोदा येथे सावली संस्थेस भेट.
 येवला : पुढारी वृत्तसेवा

विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा च्या कार्याची माहिती घेणे व युवकांशी संवाद साधण्यासाठी आज युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाचे केंद्रीय उपसचिव मनीष किशन यांनी पाटोदा येथे भेट दिली.
सध्या केंद्रीय पातळीवरून सचिव व उपसचिव दर्जाचे अधिकारी विविध ठिकाणी समीक्षा बैठक घेऊन युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत असून त्या अंतर्गत येवला तालुक्यात कार्यरत असणाऱ्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट समाजसेवी संस्था पुरस्कार प्राप्त सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा च्या सर्व युवकांशी संवाद साधत आज युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारचे उपसचिव मनीष किशन यांनी पाटोदा येथे भेट दिली, विविध सामाजिक कार्य करण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजवर केलेल्या विविध सामाजिक कामांचा आढावा घेतला व येणाऱ्या काळात अधिकाधिक समाजकार्यामध्ये सहभागी होणा-या युवकांची साखळी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी नेऊरगाव येथील शिवशंभुचे वारकरी परिवाराचे स्वयंसेवकही उपस्थित होते. तसेच नेहरू युवा केंद्र नाशिकचे जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, केंद्र समन्वयक सुनील पंजे, सावली संस्थेचे अध्यक्ष परसराम शेटे, संदीप बर्शीले, शेखर कदम, पंकज मढवई, वैभव शेटे, रवी भाऊ, गणेश कदम, अमोल बोनाटे, अक्षय काळे, सावलीचे सचिव महेश शेटे, युवा राष्ट्रीय स्वयंसेविका रूपाली निकम, रवींद्र बिडवे आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने