वाचन व अभ्यास चळवळ गतिमान केल्याखेरीज महापुरुषांचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य- डॉ सुरेश कांबळे..

वाचन व अभ्यास चळवळ गतिमान केल्याखेरीज महापुरुषांचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य- डॉ सुरेश कांबळे.. सलग सोळा तास अभ्यास उपक्रम समितीच्या कार्यक्रमात प्रतिपादन  

येवला  : पुढारी वृत्तसेवा
जगातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वरती असुन संघर्ष व जिद्द हीच खरी ओळख त्यांची आहे. शाळेच्या बाहेर बसुन शिक्षण घेण्याची वेळ आलेल्या बाबासाहेबांनी याचा कधीच राग मनात न ठेवता देशाविषयी कायम प्रेम व राष्ट्राच्या उत्थानाकरीता आपले आयुष्य खर्ची घातले. विद्यार्थ्यांनी जर स्वत:ला महान होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मार्गाने जावे लागेल, वाचन व अभ्यास चळवळ गतिमान केल्याखेरीज महापुरुषांचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य असल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ व वैद्यकरत्न पुरस्कार विजेते डॉ सुरेश कांबळे यांनी केले.ते अध्यक्षस्थानी होते. येवला येथील मुक्तीभूमी विपश्यना सभागृहात अनुभव शिक्षण प्रशिक्षण सामाजिक बहुउद्देशीय संस्था व सलग अठरा तास अभ्यास उपक्रम समितीच्या वतीने अभ्यास उपक्रम राबविण्यात आला.यामध्ये सुमारे पासष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते.पारंपरीक विचारांतुन बाहेर येऊन नवा विचार वृध्दींगत व्हावा व महापुरुषांच्या जयंत्या या वैचारिक पातळीवर साजऱ्या व्हावा या उद्देशाने सलग नऊ वर्षांपासून हि समिती धडपडत आहे. या समितीचे मुख्य प्रवर्तक हिरामण मेश्राम यांनी बुध्दीवंत लोकांनी अशा उपक्रमांत मोठा सहभाग नोंदवीणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले परंतु दुर्दैवाने तसा सहभाग नोंदविला जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचा कुठल्याही प्रकारचा पेटंट नसुन यात कुणीही सहभागी होऊन आपापल्या गाव शहरात हा वाचन व अभ्यास उपक्रम राबवु  शकतो असे सांगितले. सकाळी ठीक सहा वाजता उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारच्या सत्रात मानसशास्राचे अभ्यासक अमितकुमार कलकुंडे यांनी अभ्यासाची शिस्त वाढण्याकरीता व विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. यावेळी काष्ट्राईब संघटना पदाधिकारी सोमनाथ खळे व छत्रपती क्रांति सेनेचे पदाधिकारी रविंद्रनाथ शेळके यांनी सहकार्य केले. सायंकाळच्या सत्रात विकास वाहुळ, लिना मेश्राम, तुळशीराम खंडागळे, राजरत्न वाहुळ, संगिता वाहुळ, रुपाली खंडागळे पुजा कसारे आदींनी सहभाग घेतला. विकास वाहुळ यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर व त्यांच्या सामाजिक आंदोलनात्मक भूमिकेवर प्रकाश टाकला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी समिती सदस्य विनोद त्रिभुवन, नितीन संसारे, प्रविण खंडागळे निलेश देशमुख राजेंद्र झाल्टे, सुभाष वाघीरे आदींनी परिश्रम घेतले. अभ्यास उपक्रमात पासष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण,चहा, नाश्ता देण्यात आला. सायंकाळच्या सत्रात प्रास्तविक व सुत्रसंचलन नितीन संसारे यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने