पर्यावरण व वृक्ष मित्र माधव पिंगळे यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड
येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुका येवला जिल्हा नाशिक येथील पर्यावरण व वृक्षप्रेमी प्राथमिक शिक्षक माधव पिंगळे यांची् निसर्ग व सामाजिकरण प्रदूषण निवारण मंडळाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी मंडळावर सदस्य निवड झाली .
माधव पिंगळे हे येवले तालुक्यात पर्यावरण व वृक्षमित्र म्हणून ओळखले जातात बालपणापासून त्यांनी ही आवड जपली आहे वयाच्या पंधरा वर्षापासून वृक्ष प्रेमाची आवड जपत आले आहे. स्वतःच्या शेतात 1989 पासून विविध वृक्ष लागवड केलेली असून आज अभिमानाने लावलेली वृक्ष दाखवतात. हीच आवड 1993 साली नोकरी् लागल्यापासून विविध शाळेत, शाळा हिरवीगार व सुशोभित करण्यात मोलाचा हातभार लावला आहे .या कामात त्यांनी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग घेऊन जाणीवपूर्वक जागरूकता निर्माण करीत आहे .विद्यार्थ्यांच्या मदतीने दरवर्षी विविध झाडांच्या बिया संकलन करून पावसाळ्यापूर्वी बिजारोपण कार्यक्रमाच आयोजन करतात. मुलांना आपल्या घरापासून ते शाळेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बिजारोपण करण्यास प्रेरणा देऊन वृक्ष लागवडीचा प्रयोग करतात. पहिल्यांदा त्यांनी स्वतः शेतात आणि गावात विविध वृक्ष लावून परिसर हिरवा गार बनवला आहे. वड ,पिंपळ ,बकुळ ,करंज अशी जास्त सावली देणारी व पर्यावरणास हातभार लावणारी झाडे लावण्यावर त्यांचा भर असतो. मयत व्यक्तींच्या स्मरणार्थ वड ,पिंपळ ही झाडे लावून स्वतःच्या गावात चांगला प्रयोग राबवला आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी हवा, पाणी, पाणी, पर्यावरण राहिले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. आज जागतिक तापमान वाढ आणि् पर्यावरणीय समस्या नी डोके वर काढले आहे. तेव्हा आजच्या पिढीने पर्यावरण संवर्धन बाबत जागरूक झाले पाहिजे. असे मुलांना आणि तरुण पिढीला कळकळीचे आवाहन करतात.
पर्यावरणीय समस्यांचा सगळ्यात जास्त फटका आपलया अन्नदात्याला बसतो आहे. त्यामुळे शेती उध्वस्त होत असून शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागला आहे. या गोष्टी विद्यार्थ्यांना पटवून हवा, पाणी, पाणी आणि विज याविषयी जागरूकता निर्माण करीत आहे यासाठी शेतीत विषमुकत अन्न , भाजीपाला ,सेंद्रिय शेती,या संकल्पना भावी पिढीला समजून कृती करण्याची व स्वतःपुरती का होईना सेद्रीय शेती राबवली पाहिजे.
शालेय आवारात पडणाऱ्या पालापाचोळ्याची कंपोस्ट खत निर्मिती हा प्रकल्प राबवीत असून नुकताच् त्यांचा कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प जिल्हा शिक्षण नुकताचउतसव2022 /2023 कार्यक्रमात निवडला गेला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांनी प्रकल्प समजून प्रत्येक शाळेत राबविण्यास् सांगितले. शाळेत विविध दिनविशेष राबवून मुलांना माहिती देतात. स्वतःच्या छोट्याशा रोपवाटिकेतून दरवर्षीच्या पावसाळ्यात् झाडे लावून स्वागत केले जाते. प्रत्येक कुटुंबाला एक पारिजातक व प्रत्येकाला एक सागाचे रोप भेट देऊन त्याचे संगोपन करण्याची शपथ मुलांना दिली. असे विविध उपक्रम राबवून वृक्षांबद्दल पर्यावरणाबद्दल लळा लावल्या चे जाणकार सांगतात. झाडांबद्दल चे अज्ञान मुले आवर्जून त्यांना विचारतात व माहिती अवगत करून घेतात.
अशा पर्यावरण संवर्धनाची कास धरलेल्या माधव पिंगळे यांना निसर्ग व पर्यावरण प्रदूषण मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी पदावर काम करण्याची संधी देऊन सन 2023 ते 2026 पर्यंत नियुक्ती केली असून गौरवपत्र् देऊन गौरव केला आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे. त्याच बरोबर निसर्ग व समाजिक पर्यावरणमंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे ,पर्यावरण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश केदारी ,राज्य संपर्क प्रमुख प्रा.अनिल लोखंडे , जिल्हा कार्यकारिणीसदस्य अर्जुन राऊत ,सर्व पर्यावरण पदाधिकारी,तालुक्यातील शिक्षक मित्र आदिनी अभिनंदन केले आहे