सुनील खरे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित
येवला - पुढारी वृत्तसेवा
विखरणी ता. येवला येथील सुनील खरे ह्यांना नारायणगाव येथे नुकतेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
सुनील खरे हे दान पारमिता फाउंडेशनच्या अंतर्गत प्राचीन लिपि निशुल्क रीत्या शिकवत असतात त्यांनी आत्तापर्यंत १० हजार विद्यार्थ्यांना धम्मलिपि निशुल्क शिकवली असून महाराष्ट्रातील विविध लेणींवर आत्तापर्यंत त्यांच्या ५० निशुल्क कार्यशाळा संपन्न झालेल्या आहे,
धम्मलिपि शिकून झाल्यावर शिकलेल्या विद्यार्थ्यांना लेणींवर नेले जाते त्यांची धम्मलिपिची लेखी परीक्षा घेतली जाते व त्यानंतर उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना
ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येते,
त्यांच्या ह्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण यांनी घेतली व त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,
इतिहासाचे अभ्यासक , वक्ते यशवंत गोसावी ह्यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,
ह्याप्रसंगी संस्थेचे सचिव अशोक खरात, अध्यक्ष गणेश व्हावळ, खजिनदार उमेश वाघांबरे व शंकर रोकडे हे सदस्य उपस्थित होते