येवल्यातील केदार क्षत्रिय याला एम.एस.साठी मिळाला कोलंबिया विद्यापीठात प्रवेश



येवल्यातील केदार क्षत्रिय याला एम.एस.साठी मिळाला कोलंबिया विद्यापीठात प्रवेश


येवला : पुढारी वृत्तसेवा

येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय यांचा मुलगा केदार क्षत्रिय याची एम.एस.(मास्टर ऑफ सायन्स इन मॅनेजमेंट,सायन्स अँड इंजिनिअरिंग) साठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
केदारचे येथे बारावीपर्यत शिक्षण झाले असून अभियांत्रिकीचे शिक्षण  पुणे येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले आहे.त्यानंतर गुणवतेच्या आधारे न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात व्यवस्थापन विज्ञान आणि अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.युनायटेड स्टेट्समधील पाच विद्यापीठांमध्ये आणि जगातील १० सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये सातत्याने स्थान मिळालेली ही प्रतिष्ठित विद्यापीठ आहे.तसेच उत्कृष्ट शिक्षणासाठी आणि अत्यंत स्पर्धात्मक प्रवेशांसाठी प्रसिद्ध आहे. केदारचा यूएस स्टुडंट व्हिसा मंजूर झाला असून लवकरच तो येथे रवाना होणार आहे.
कोलंबिया व्यतिरिक्त केदारला कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी सारख्या इतर प्रतिष्ठित विद्यापीठांकडून ऑफर देखील मिळाल्या.तथापि जगात नामांकित असल्याने त्याने कोलंबिया विद्यापीठात आपला प्रवेशासाठी निवड केली आहे.
कोलंबिया विद्यापीठात बराक ओबामा (अमेरिकेचे ४४ वे अध्यक्ष),अलेक्झांडर हॅमिल्टन (यूएसएचे संस्थापक जनक), डॉ. बी.आर.आंबेडकर (भारतीय संविधानाचे जनक),आणि वॉरन बफेट (बर्कशायर हॅथवेचे सीईओ) या जगप्रसिद्ध व्यक्तींनी शिक्षण घेतले आहे.या ठिकाणी शिक्षणासाठी संधी मिळत असल्याने क्षत्रिय कुटुंबाने आनंद उत्सव केला आहे.आमच्या कुटुंबाने आरोग्य सेवेत नावलौकिक केला असून पुढच्या पिढीने हाच लौकिक टिकून ठेवला आहे.त्यामुळे कुमारने मिळवलेले यश आमच्यासाठी व  शहरासाठी कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया डॉ.चंद्रशेखर क्षत्रिय यांनी दिली.

थोडे नवीन जरा जुने