डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात 

येवला :  पुढारी वृत्तसेवा 

बस मधून डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार टोळीचा येवला तालुका पोलीसांनी  छडा लावला आहे. याप्रकरणी चार अट्टल गुन्हेगारांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

येवला तालुका पोलीस स्टेशन कडील गुरनं. २३९ / २०२३ भादवि कलम ३७९, ३४ व गुरनं. २३३ / २०२३ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे राजापुर येथील एस. टी. बस मधील डिझेल चोरीच्या दाखल गुन्हे दाखल होते.

सदरचे गुन्हे दाखल झाले नंतर , नाशिक ग्रामीण, तसेच  येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनकडील तपास पथक सहा. पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत,सहा. पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पो. हवा. माधव सानप,  पोहवा ज्ञानेश्वर हेंबाडे, पोना राजेंद्र केदारे, पोना सचिन वैरागर, पोना ज्ञानेश्वर पल्हाळ,  पोकॉ. संतोष जाधव, पोकॉ. सागर बनकर १
पोकॉ. आबासाहेब पिसाळ यांनी गुन्ह्याचे घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करुन तसेच एस. टी. बस पार्कंगचे ठिकाणचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीतीचे कसुन विश्लेषण करुन अनोळखी गुन्हेगाराबाबत गुप्त बातमीदार व जनसंपर्कातुन गोपनिय माहीती मिळवून सदर गुन्ह्याचा मास्टर माईन्ड अमोल भाऊसाहेब कोटमे, वय २६ वर्ष, रा. कोटमगांव बिठ्ठलाचे ता. येवला जि. नाशिक यास ताब्यात घेवुन त्याचेकडेस सखोल तपास करुन त्याचे साथीदार  विजय गणपत जाधव, वय ३७ वर्ष, रा. गोंदवणी रोड वार्ड नं. श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर, हल्ली रा. पद्मकुंज, सुशिल ढोमसे यांचे घर नं. ४ मध्ये अंगणगांव ता. येवला जि. नाशिक  शुभम संदीप गायकवाड, वय २० वर्ष रा. कोटमगाव खु॥ (देवीचे) ता. येवला  राजेंद्र उर्फ बंडु अशोक कोटमे वय ३० वर्ष, रा. कोटमगांव विठ्ठलाचे ता. येवला यांना वेगवेगळे ठिकाणावरुन त्यांचा शोध घेवुन त्यांना पकडले आहे. पकडलेल्या चोरट्यांनी राजापुर ता. येवला जि. नाशिक येथे बस क्र. MH १४, BT - ३८११ या बस मधील डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. लुटमार करणाऱ्या पैकी एक साथीदार फरार आहे. पकडलेल्या वरील ४ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हेगाराकडुन डिझेल चोरीसाठी वापरणयात येणारी पांढऱ्या रंगाची मारुती स्विप्ट कार क्र. MH-०४ FZ-२७१३ किमंत रुपये ३१००००/- व ७०/- लिटर चोरी केलेले डिझेल व डिझेल चोरीचे साहित्य असा एकुण ६३०००/- रुपये असा एकुण ३७०३००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन इतर गुन्ह्यातील देखील मुद्देमाल हस्तगत करीत आहोत.

सदर गुन्हेगाराचा गुन्हे अभिलेख तपासला असता पोलीसांना आरोपी नामे १) विजय गणपत जाधव, वय ३७ वर्ष, रा. गोंदवणी रोड वार्ड नं. श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर, हल्ली रा. पद्मकुंज, सुशिल ढोमसे यांचे घर नं. ४ मध्ये अंगणगांव ता. येवला जि. नाशिक याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समजले, इतर आरोपीचा गुन्हे अभिलेख पोलीस तपासीत आहे. सदर आरोपीकडुन येवला तालुका पोलीस स्टेशनकडील एकुण डिझेल चोरीचे ३ गुन्हे उघड झाले असुन इतर गुन्ह्याचा तपास चालू आहे. तसेच त्यांचेकडुन येवला शहर पोलीस स्टेशन, वैजापुर पोलीस स्टेशन, कोपरगांव पोलीस स्टेशन यांचेकडील देखील डिझेल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

थोडे नवीन जरा जुने