येवल्यात मोफत नेत्र तपासणी शिबिर,उन्हापासून बचावाचे केंद्रीय मंत्री पवार यांचे आवाहन

२७२ रुग्णांची तपासणी,१५ जणांची होणार मोतीबिंदूची शस्रक्रिया
येवल्यात मोफत नेत्र तपासणी शिबिर,उन्हापासून बचावाचे
केंद्रीय मंत्री पवार यांचे आवाहन


येवला : पुढारी वृत्तसेवा

येथील भाजपच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिरात आज २७२ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.विशेष म्हणजे यातील १५ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असून ३० जणांना चष्मे वाटप देखील केले जाणार आहे.
येथील भारतीय जनता पार्टी व जिल्हा विद्यार्थी आघाडीच्या वतीने  ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.परिसरातील रुग्णांसाठी नेत्ररोग तपासणी शिबिर व उपचार या ठिकाणी करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर,उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.शैलजा कुप्पास्वामी, शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम आदींची उपस्थिती होती.
भाजपाने राबविलेला हा उपक्रम उपयुक्त असून शहर व तालुक्यातील गरजूनी शिबिराचा लाभ घेऊन मोफत उपचार करून घ्यावे असे आवाहन यावेळी मंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.सध्या प्रचंड प्रमाणात उष्णतेत वाढ झाली आहे,उष्मघाताचे प्रकारही वाढत आहे.त्यामुळे नागरिकांनी शक्यतो उन्हाच्या तडाख्यात घराच्या बाहेर पडू नये.गरज असल्यास टोपी, रुमाल,गॉगल यासह बचावात्मक साहित्याचा वापर करावा.सतर्क राहून काळजी घेणे हेच आपल्या हातात असल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी.उष्मघाताच्या घटना टाळण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क असून असल्याचे यावेळी डॉ.पवार यांनी सांगितले.
आजच्या शिबिरात विविध प्रकारच्या आजाराच्या २७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११७ जणांची डोळ्याची तपासणी करण्यात आली असून त्यातील १७ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली आहे. मंगळवारी अजून तपासणी करण्यात येऊन नंतर शस्त्रक्रिया केली जाईल तसेच गरज असलेल्या ३० जणांना चष्मे बनवून त्याचे वाटपही केले जाणार असल्याची माहिती समीर समदडीया यांनी दिली.तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाचे नेत्र शल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार बोदाडे,डॉ.अक्षय जाधव,नगरसुल रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी राजेंद्र पराळकर, मनमाडचे नेत्र चिकित्सा अधिकारी रवींद्र मोरे तसेच येथील अधिक्षक डॉ.शैलाजा कुप्पास्वामी व त्यांच्या वैद्यकीय टीमने रुग्णांच्या तपासणीसाठी मेहनत घेतली.मोठ्या संख्येने नागरिक शिबिरात सहभागी झाले होते
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया,ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी,कामगार नेते श्रावण जावळे,जैन समाजाचे अध्यक्ष विजय श्रीश्रीमाळ, भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी,ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजूसिंग परदेशी,तालुकाध्यक्ष नंदकिशोर शिंदे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चेतन धसे,तालुका सरचिटणीस नाना लहरे,युवा नेते युवराज पाटोळे,युवाचे तालुकाध्यक्ष संतोष केंद्रे,सरपंच दत्ता सानप,गणेश गायकवाड,बडा शिंदे,महेश पाटील,कृष्णा काव्हात,संतोष काटे,बापू गाडेकर,छगन दिवटे, संजय भोसले,संजय कुक्कर,रमेश भावसार,मच्छिन्द्र हाडोळे,मच्छिन्द्र पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद शिंदे यांनी केले.
● महाजनांचा जमिनीहुन फोन!
मंत्री गिरीश महाजन सद्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत.आज एवढ्या गर्दितही आज शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आयोजक व भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर  समदडीया यांच्या फोनवर व्हिडिओ कॉलवरून उपस्थितांना मार्गदर्शन केले.सर्वसामान्य व गरजूंसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून गरज असेल तर त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रियाही केल्या जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
फोटो
येवला : येथ मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार,समीर समदडिया, आंनद शिंदे आदी.
थोडे नवीन जरा जुने