महाबीज च्या अनुदानित बियाणांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन



महाबीज च्या अनुदानित बियाणांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

येवला : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अंतर्गत महाबीजच्या खरीप हंगाम २०२३ साठी शेतकऱ्यांनी अनुदानित सोयाबीन, मूग ,उडीद ,तूर इत्यादी पिकांच्या बियाणांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी विभाग व पंचायत समिती येवला कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे .राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत सोयाबीनचे फुले संगम, फुले किमया, एएम एस १००१, एएमयुएस ६१२ मूग उत्कर्ष पीकेव्ही, एकेएम ४ , उडिद एकेयु१०, टियु १,  तुर फुले १२,बीडीएन ७१६, इत्यादी वान अनुदानित दराने येवला येथील वितरक नंदा सीड्स येवला यांच्याकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सातबारा उतारा व आधार कार्ड सह संपर्क साधून परमिट प्राप्त करून घ्यावे. सदर परमिट घेऊन दुकानदाराकडून बियाणे प्राप्त करावे .तसेच बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम, अझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा इत्यादी जैविक खते देखील अनुदानित दराने खरेदी करावे .असे आवाहन करण्यात आले आहे. या बियाणे खरेदीस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ,जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
थोडे नवीन जरा जुने